Logo
Latest Blog

गर्भधारणा कशी करावी: आपल्याला सर्व माहित असणे आवश्यक आहे

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

सारांश : अनेक जोडपी गर्भधारणेत अयशस्वी होतात; कारण ते ओव्यूलेशन पिरियड चुकवता. गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. नैसर्गिक पद्धतीने किंवा फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा कशी करावी यासह गर्भधारणेसाठी महत्त्वपूर्ण आणि रिप्रॉडक्टिव्ह हार्मोनचे कार्य समजावून सांगणे हाच या लेखाचा उद्देश आहे.

गर्भधारणेसाठी महत्त्वपूर्ण 

गर्भधारणा कशी करावी

महिलेच्या पोटामध्ये मध्यभागी पेअर फळाच्या आकाराचे गर्भाशय असते. खाली गर्भाशयाचे मुख योनीमार्गाचा जोडलेले असते. आणि वरच्या दोन्ही बाजूला दोन अंडाशय असतात. अंडाशय आणि गर्भाशय गर्भनलिकांनी जोडलेले असतात.

  • अंडाशय :  अंडाशयात दर महिन्याला एक स्त्रीबीजाचा विकास होतो. परिपक्व आणि फुटलेले स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर पडतात. या काळाला ओव्यूलेशन काळ म्हणतात. गर्भधारणेसाठी ओवुलेशन हि महत्त्वाची क्रिया आहे.  
  • फेलोपियन ट्यूब : अंडाशयातून सोडलेले स्त्रीबीज फेलोपियन ट्यूब मध्ये येतात. अर्थात बीज आपसूकच ट्यूबमध्ये येत नाही. गर्भनलिकेच्या मुखाच्या पुढे केसाळ रचना असलेले फिम्ब्रिया असतात. त्यांच्यामार्फत स्त्रीबीज गर्भनलिकेत ढकलले जातात. फेलोपियन ट्यूब मध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे फर्टिलायझेशन प्रक्रिया होत असते. ज्यामुळे तुम्हाला गर्भधारणा होते.
  • गर्भाशय : गर्भाशय साधारण मूठभर आकाराचे असते.  एन्डोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरीमेंट्रीयम अशा ३ थरांनी बनलेले असते. एन्डोमेट्रियम म्हणजेच युटेरियन लायनिंग. याला गर्भाशयाचे अस्तर देखील म्हणतात. फेलोपियन ट्यूब मध्ये तयार झालेला गर्भ इथे येऊन रुजतो आणि ९ महिने गर्भाशयात वाढतो.
  • गर्भाशय ग्रीवा : संभोगादरम्यान हजारो शुक्राणू गर्भाशय ग्रीवेमार्फत गर्भाशयात प्रवेश करतात.
  • स्क्रोटम आणि टेस्टिकल : पुरुषांच्या अंडकोषात २ टेस्टिकल (वृषणकोष) असतात. शुक्राणूंची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे कार्य या अवयवात होत असते.
  • शुक्राणू वाहिनी : याला व्हास डिफरेन्स म्हणतात. अंडकोषातील शुक्राणू पेनिज मध्ये वाहून नेणारी नलिका म्हणजे व्हास डिफरेन्स.

नैसर्गिक गर्भधारणा स्टेप बाय स्टेप

  1. ओव्यूलेशन : ओवुलेशन काळात महिलांच्या अंडाशयातून एक स्त्रीबीज फुटून बाहेर पडते. फम्ब्रिया कडून हे बीज फेलोपियन नलिकांमध्ये फर्टिलायझेशन साठी पाठवले जाते.
  2. फर्टिलायझेशन : ओवुलेशन काळात संभोग झाल्यास हजारो शुक्राणूंपैकी केवळ एका शुक्राणूकडून स्त्रीबीज फलित होते. म्हणजे गर्भ तयार होतो. पुढील ३ ते ५ दिवस डीएनए फ्रॅगमेंटेशन होते. २, ४, ६, ८ या संख्येत पेशींचे विभाजन होते आणि गर्भ तयार होतो.
  3. इम्प्लांटेशन : ३ ते ५ दिवसादरम्यान गर्भ गर्भाशयात उतरून येतो. आणि गर्भाशयातील अस्तरामध्ये रुजतो. अस्तरामध्ये गर्भाचे पोषण होते. आणि पुढील ९ महिने गर्भाशयात गर्भाचा विकास होतो.

आययूआय (IUI) सह गर्भधारणा कशी होते?

जेव्हा सौम्य स्वरूपाच्या वंध्यत्व समस्यांमुळे गर्भधारणेत अडचणी येतात तेव्हा पहिला उपचार आययूआय केला जातो.

  • ओवॅरियन स्टिम्युलेशन : आययूआय प्रक्रियेत फर्टिलिटी मेडिसिन च्या मदतीने एकापेक्षा जास्त स्त्रीबीजांचा विकास केला जातो. याला ओवॅरियन स्टिम्युलेशन म्हणतात.
  • फॉलिक्युलर स्टडी : अल्ट्रासाउंड च्या मदतीने वेळोवेळी स्त्रीबीजांची वाढ तपासली जाते. याला फॉलिक्युलर स्टडी म्हणतात.
  • स्पर्म ट्रान्स्फर : जेव्हा अंडाशय स्त्रीबीज सोडते तेव्हा एका कॅथेटर च्या साहाय्याने पुरुषांचे शुक्राणू महिलेच्या गर्भाशयात सोडले जातात. शुक्राणूंचा प्रवास निम्मा करून गर्भधारणेची संभावना वाढवली जाते. पुढील कन्सेप्शन आणि इम्प्लांटेशन प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते.

IUI हि फर्टिलिटी उपचारांमधील फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणून ओळखली जाते. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर च्या फर्टिलिटी कन्सल्टन्ट Dr. Sonali N. Malgaonkar म्हणतात कि, खासकरून IUI साठी निवडलेल्या केसेस ला ३ सायकल मध्ये रिझल्ट मिळणे अपेक्षित असते. प्रोजेनेसिस मध्ये अशा निवडक अनेक दांपत्त्यांना IUI मार्फत गर्भधारणा झालेली आहे.

आयव्हीएफ (IVF) सह गर्भधारणा कशी होते ?

आयव्हीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. शरीराबाहेर स्त्रीबीज आणि शुक्राणूंचे फर्टिलायझेशन केले जाते.

  • ओवरियन स्टिम्युलेशन : प्रक्रियेच्या सुरुवातीला ओवरियन स्टिम्युलेशन च्या साहाय्याने एकापेक्षा अधिक स्त्रीबीजांचा विकास केला जातो.
  • ओवम पीक अप व स्पर्म कलेक्शन : फर्टिलायझेशन साठी तयार असलेली अशी फुटलेली स्त्रीबीजे संकलित केली जातात. त्यासाठी मातेला भूल देऊन ओवम पीक अप करतात. याचवेळी पुरुषांचे शुक्राणू मिळवले जातात.
  • फर्टिलायझेशन : लॅब मध्ये एका पेट्री ट्रे मध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू एकमेकात मिसळले जातात आणि फर्टिलायझेशन साठी ठेवले जातात.
  • एम्ब्रियो ट्रान्स्फर : गर्भ तयार झाल्यानंतर मातेच्या गर्भाशयात गर्भ ट्रान्स्फर केला जातो.

तुम्हाला माहिती आहे का? प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये आजवर हजारो वंध्यत्व जोडप्यांनी IVF च्या मदतीने स्वस्थ आणि निरोगी बाळांना जन्म दिला आहे.

अधिक माहितीसाठी: https://www.youtube.com/@ProgenesisFertilityCenter

गर्भधारणेसाठी मासिक पाळी चक्र आणि हार्मोन चे कार्य समजून घ्या.

मासिक पाळीचे ३ टप्पे असतात. त्यामध्ये वेगवेगळे रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन रिप्रॉडक्शन साठी सिग्नल देतात आणि गर्भधारणेची क्रिया घडत असते.

  1. फॉलिक्युलर टप्पा : मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. या वेळी, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच) आणि ल्युटेनिझिंग हार्मोन (एलएच) तयार होतात. हे हार्मोन अंडाशयांना स्त्रीबीज सोडण्याचे सिग्नल देतात. अंडाशयात अनेक स्त्रीबीजांपैकी एका स्त्रीबीजाचा विकास होतो. यावेळी इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण वाढते.
  2. ओव्ह्युलेटरी टप्पा : ल्युटेनायझिंग हार्मोनचे प्रमाण आणखी वाढते. यावेळी अंडाशयातून स्त्रीबीज बाहेर पडण्याची प्रक्रिया पार पडते. स्त्रीबीजे सोडण्याच्या या प्रक्रियेला ओवुलेशन म्हणतात.
  3. ल्युटल फेज : ओव्हुलेशन नंतरचा पुढील मासिक पाळीपर्यंतचा कालावधी म्हणजे ल्युटल फेज. एग बाहेर पडल्यानंतर ते एका नवीन संरचनेत विकसित होते, ज्याला 'कॉर्पस ल्यूटियम' म्हणतात.

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न:

१) PCOD / PCOS सह गर्भधारणा कशी करावी?

PCOD किंवा PCOS कंडिशन मध्ये ओव्यूलेशन अनियमित होत असल्यामुळे गर्भधारणेचा योग्य काळ समजून  येत नाही  अशा वेळी फर्टिलिटी डॉक्टरांकडील ओवुलेशन मॉनिटरिंग आणि ओव्यूलेशन इंडक्शन उपचारांच्या मदतीने गर्भधारणा होऊ शकते. अधिक कॉम्प्लिकेशन असल्यास IUI किंवा IVF उपचारांनी निश्चित गर्भधारणा होऊ शकते.

२) अनियमित ओव्यूलेशन सह गर्भधारणा कशी करावी?

तुमचे वय कमी असेल आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न सुरु करून १ वर्षाहून कमी कालावधी झालेला आहे. तर या वेळी घरच्याघरी डिजिटल ओवुलेशन प्रेडिक्टर किट च्या मदतीने ओव्यूलेशन डे समजून घ्यावा. योग्य वेळी इंटरकोर्स केल्यास आणि स्वस्थ जीवनशैली अंगिकारल्यास नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकते. १ वर्षापर्यंत प्रयत्न करूनदेखील गर्भधारणा होत नसेल तर मात्र फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...