Logo
Latest Blog

स्त्रियांची मासिक पाळी बंद झाल्यावर मूल होऊ शकते का?

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

४०-४५ वयानंतर मासिक पाळी बंद होणे म्हणजे मेनोपॉज. अर्थात रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती ही रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन ची नैसर्गिक घट आहे जी स्त्रियांच्या वाढत्या वयानुसार होते. 45 वर्षांनंतर बहुतेक स्त्रियांना रजोनिवृत्ती येते. या काळात महिलांच्या अंडाशयातून हार्मोन्स तयार होणे बंद होते आणि मासिक पाळीही थांबते, परिणामी महिलांची गर्भधारणेची क्षमता कमी होते.

तुमचे वय ३० किंवा ३५ पेक्षा कमी आहे आणि मासिक पाळी बंद झाली आहे? तर हार्मोनल विकार, लाइफस्टाइल, अमेनोरिया, POI (Primary ovarian insufficiency) यांसारख्या अनेक स्थितीत कमी वयात मासिक पाळी बंद होते.

परंतु याचा अर्थ असा नाही की मासिक पाळी बंद झाल्यावर गर्भधारणा "अशक्य" आहे. सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (ART Lab), IVF ट्रीटमेंट च्या मदतीने यशस्वी गर्भधारणा शक्य आहे.

रजोनिवृत्तीचा थोडक्यात परिचय

मासिक पाळी बंद झाल्यावर मूल होऊ शकते का? यासाठी आधी रजोनिवृत्ती म्हणजे काय आणि रजोनिवृत्ती आल्याचे कसे समजावे? हे जाणून घेणे गरजेचे आहे.

तुम्हाला माहीत आहे का? रजोनिवृत्ती हि काही एकाएकी घडणारी घटना नाही. साधारणपणे ४० वयानंतर तुमची मासिक पाळी कमी होण्यास सुरुवात होते, रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन्स मध्ये घट होत जाते, अंडाशयाकडून होणारी एग रिलीज प्रोसेस थांबते आणि शेवटी मासिक पाळी पूर्णपणे थांबते. साहजिकच या रजोनिवृत्तीच्या संपूर्ण प्रवासात महिलांना कमी-अधिक लक्षणे दिसून येतात.

लक्षणांमध्ये :

  • हॉट फ्लॅश
  • घाम येणे
  • हृदयाची धडधड होणे
  • मूड स्विंग होणे
  • आक्रमक वागणूक
  • झोपेच्या आणि जेवणाच्या सवयीनमध्ये बदल
  • थकवा
  • योनीत कोरडेपणा जाणवणे
  • मासिक पाळी अनियमित होणे
  • यौन इच्छा कमी होणे

अशी लक्षणे कमी किंवा जास्त प्रमाणात दिसून येतात.

अशी लक्षणे दिसली किंवा काही महिने पाळी न येणे म्हणजे तुम्हाला रजोनिवृत्ती आहे असे अजिबात नाही.

रजोनिवृत्ती येण्याचे टप्पे :

  1. पेरीमेनोपॉज : पेरीमेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती येण्याचा टप्पा. ४० च्या दशकात रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागतात तो टप्पा म्हणजे पेरिमोनोपोज.
  2. मेनोपॉज : म्हणजे जेव्हा तुमच्या ओव्हरीज काम करणे थांबवतात. मॅच्युअर एग्ज रिलीज होणे थांबते आणि सोबतच रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन चे उत्पादनही थांबते. ४५ ते ५५ वयात रजोनिवृत्ती येते.
  3. पोस्ट मेनोपॉज : जेव्हा सलग १२ महिने पाळी येत नाही तेव्हा समजावे कि तुम्ही पोस्ट मेनोपॉज स्थितीत आहेत. अर्थात रजोनिवृत्तीनंतरचा कालावधी.

रजोनिवृत्ती केव्हा समजावी?

जेव्हा सलग १२ महिने किंवा त्याहून अधिक काळ तुम्हाला मासिक पाळी आली नसेल आणि सोबतच वरील लक्षणांचा अनुभव तुम्हाला होत आहे, तेव्हा तुम्ही रजोनिवृत्त असण्याची दाट शक्यता असते. परंतु, केवळ या गृहितकावर तुम्ही रजोनिवृत्त आहेत हे ठरवण्यापूर्वी एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन रजोनिवृत्तीची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

मासिक पाळी बंद होण्याची इतर कारणे

तुमचे वय ३० च्या दशकात आहे आणि तुम्ही पाळी बंद झाल्याचा अनुभव करीत आहेत तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

  • गर्भनिरोधक पद्धतींचा वापर
  • इंट्रायूटरिन उपकरणे (IUDs)
  • अतिशय वजन कमी असणे
  • वजन अतिशय जास्त असणे
  • असंतुलित आहाराचे सेवन आणि कुपोषण
  • स्ट्रेस डिसऑर्डर
  • हार्मोनल विकार
  • अमेनोरिया आजार
  • POI (Primary ovarian insufficiency)

अशा कारणांमुळे तुम्ही आई होण्याच्या प्रवासात अडचणी निर्माण होतात. परंतु काळजी करू नका. फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आधुनिक ART उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.

रजोनिवृत्तीनंतर गर्भधारणा शक्य आहे का?

रजोनिवृत्तीनंतर गर्भवती होण्यासाठी आव्हानात्मक असू शकते, फर्टिलिटी उपचारांची गरज लागते परंतु गर्भधारणा शक्य आहे.

हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कि, रजोनिवृत्ती नंतर नैसर्गिक गर्भधारणेची संभाव्यता राहत नाही. ART तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा IVF आणि ऍडव्हान्स IVF ने गर्भधारणा होऊ शकते. असे ऍडव्हान्स तंत्रज्ञान म्हणजे मासिक पाळी बंद झाल्यावर आई होऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक वरदानच आहे.

आधुनिक फर्टिलिटी उपचारांमध्ये महिलेची मासिक पाळी पुन्हा सुरु केली जाते आणि IVF उपचारांनी गर्भधारणेची शक्यता वाढवली जाते. अर्थात, तुम्ही रजोनिवृत्तीच्या कोणत्या टप्प्यात आहेत त्यानुसार ट्रीटमेंट प्लॅन केली जाते.

मासिक पाळी बंद झाल्यामुळे गर्भधारणा होत नाहीये? आजच संपर्क करा.

Free consultation

मासिक पाळी बंद झाल्यावर मूल होण्यासाठी फर्टिलिटी डॉक्टर का निवडावे?

आपण चर्चा केली कि, रजोनिवृत्तीनंतर प्राकृतिक गर्भधारणेची कोणतीही शक्यता नसते. याशिवाय कमी वयात मासिक पाळी बंद होण्याचे कारण काय आहे? याचे ‘इन डेप्थ इव्हाल्युएशन’ होणे गरजेचे आहे.

त्यासाठी फर्टिलिटी डॉक्टर आणि फर्टिलिटी उपचार एकमेव आणि पॉजिटीव्ह रिझल्ट देणारा पर्याय आहे. ज��णून घेऊया फर्टिलिटी डॉक्टरांचे महत्त्व :

  1. फर्टिलिटी डॉक्टर फर्टिलिटी क्षेत्रातील विशेष प्रशिक्षित आणि एक्स्पर्टीज असतात.
  2. रजोनिवृत्तीच्या महिलांना आई होण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा शोध घेऊ शकतात. योग्य ट्रीटमेंट निवडण्यासाठी त्यांच्याजवळ मुबलक ज्ञान आणि अनुभव असतो.
  3. फर्टिलिटी डॉक्टर जाणतात कि, रजोनिवृत्तीच्या स्त्रियांना अनन्यसाधारण गरजा आणि चिंता असतात. महिलेचे एकूण आरोग्य, मेडिकल हिस्टरी आणि भावनिक स्थिती यासारख्या घटकांचा विचार करून ते प्रत्येक व्यक्तीसाठी 'Personalized treatment plan बनवतात.

मासिक पाळी बंद झाल्यावर गर्भधारणेसाठी टेस्ट्स आणि ट्रीटमेंट

सहाय्यक प्रजनन तंत्राचा वापर करण्यापूर्वी डॉक्टर मेडिकल हिस्टरी, कौन्सेलिंग आणि केस चा डिटेल स्टडी करतात.

कोणत्या टेस्ट करतात?

ओवरीयन रिझर्व्हम्हणजेच अंडाशयातील स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता तपासतात. त्यासाठी AMH (अँटी म्यूलेरियम हार्मोन टेस्ट) हि ब्लड टेस्ट केली जाते किंवा अल्ट्रासाउंड द्वारे ओवरीयन रिझर्व्ह तपासला जातो.
हार्मोनल टेस्टFSH, LH, प्रोलॅक्टिन, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, इंश्युलीन सारख्या ब्लड टेस्ट गरजेनुसार करतात आणि रिप्रॉडक्टिव्ह हार्मोनची पातळी तपासतात.
अल्ट्रासाउंड, लॅप्रोस्कोपी, हिस्टेरोस्कोपीअसे पर्याय गरजेनुसार वापरले जातात.
गर्भधारणेसाठी टेस्ट्स आणि ट्रीटमेंट

कोणते उपचार करतात?

  1. फर्टिलिटी मेडिसिन किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी : रजोनिवृत्तीनंतर फर्टिलिटी औषधे किंवा हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी चा वापर करून महिलेची मासिक पाळी पुन्हा सुरु केली जाते. त्यानंतर IVF केले जाते.
  2. इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) : ART तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक सक्सेसफुल ठरलेली ट्रीटमेंट म्हणजे IVF. IVF मध्ये महिलेचे फॉलिकल्स मॅच्युअर केले जातात. मॅच्युअर एग्ज मिळवले जातात. आणि पुरुष जोडीदाराच्या स्पर्म सोबत फर्टीलाइज केले जातात. अशा प्रकारे बनवलेला गर्भ मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो.
  3. सिक्वेन्शिअल एम्ब्रियो ट्रान्स्फर (SET) : हि ART तंत्रज्ञानातील आधुनिक पद्धती आहे. एकापेक्षा अधिक एम्ब्रियो ट्रान्स्फर केले जातात. सर्व एम्ब्रियो एकाच वेळी ट्रान्स्फर न करता विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या वेळी ट्रान्स्फर करून गर्भधारणेची शक्यता वाढविली जाते.
  4. प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) : या ऍडव्हान्स ART टेक्निक चा वापर करून जेनेटिकली उत्तम क्वालिटीचा एम्ब्रियो ट्रान्स्फर साठी सिलेक्ट केला जातो. PGT टेस्ट साठी एम्ब्रियो मधील सेल सॅम्पल तपासले जातात.
  5. मेल पार्टनर च्या शुक्राणूंची क्वालिटी तपासून गरजेनुसार स्पर्म कॉलेक्शन साठी TESE, PESA या स्पर्म रिट्रायव्हल टेक्निक सह  ICSI, PICSI, IMSI या फर्टीलाइजेशान टेक्निक वापरल्या जाऊ शकतात.
  6. डोनर प्रोग्राम : जेव्हा ओवरीयन रिझर्व्ह अतिशय कमी असतो अशा वेळी शेवटचा पर्याय म्हणून डोनर चे एग वापरून गर्भधारणा शक्य आहे.

रजोनिवृत्तीनंतरची गर्भधारणा तुमच्यासाठी योग्य आहे का?

रजोनिवृत्ती नंतर जर गर्भधारणेचा विचार करत आहात, म्हणजे तुमचे वय ४५ ते ५५ दरम्यान असू शकते. या वयात इतर शारीरिक आजार बळावलेले असू शकतात. जसे कि ब्लड प्रेशर, डायबेटिज, वजनवाढ, फायब्रॉईड, अनियमित ओवुलेशन, रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन ची स्थिती इ. यासाठी तुमच्या डॉक्टर शी सविस्तर चर्चा करणे गरजेचे आहे, खासकरून जेव्हा तुम्हाला पॉजिटीव्ह रिझल्ट हवे आहेत.

रजोनिवृत्ती नंतर गर्भधारणेसंबंधी Myth & Facts

Myth Facts
जेव्हा मासिक पाळी थांबते तेव्हा रजोनिवृत्ती येते.जोपर्यंत तुम्हाला सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही तोपर्यंत तुम्ही रजोनिवृत्त नसा��. पेरीमेनोपॉज मध्ये तुम्हाला अनियमित मासिक पाळी येण्याची शक्यता आहे आणि ती 8 वर्षांपर्यंत टिकू शकते.
मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकत नाही.आधुनिक उपचारांनी मेनोपॉज नंतर म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतर देखील गर्भधारणा होऊ शकते. IVF किंवा डोनर एग चा वापर करून गर्भधारणा शक्य आहे.
रजोनिवृत्ती फक्त 40 वयानंतरच होते.रजोनिवृत्तीसाठी सर्वात सामान्य वय 45 ते 55 दरम्यान आहे, परंतु काही महिलांना 30 च्या दशकात देखील मेनोपॉज येऊ शकतो. त्यासाठी काही शस्त्रक्रिया, मेडिकल कंडिशन, औषधे किंवा अनुवंशिकता कारणीभूत असू शकते.
Myth & Facts

अधिक सर्च केले जाणारे प्रश्न

रजोनिवृत्ती म्हणजे काय आणि ते सहसा कधी येते?

उत्तर : मासिक पाळी बंद होणे म्हणजेच रजोनिवृत्ती. ती एकाएकी बंद होत नाही. ३५-४० वयात रजोनिवृत्तीच्या लक्षणे दिसू लागतात आणि ४५-५५ दरम्यान रजोनिवृत्ती येते.

मासिक पाळी थांबल्यानंतरही स्त्री गर्भवती राहू शकते का?

उत्तर : नक्कीच. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी मासिक पाळी बंद झाल्यावर सुद्धा गर्भधारणा होऊ शकते.

पन्नाशीत गर्भधारणा शक्य आहे का?

उत्तर : पन्नाशीनंतर महिलेच्या शारीरिक स्थितीनुसार गर्भधारणा आव्हानात्मक असू शकते. परंतु पन्नाशीनंतर गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) सारखे उपचार उपलब्ध आहेत जे यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवतात.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...
स्त्रियांची मासिक पाळी बंद झाल्यावर मूल होऊ शकते का?