सारांश : तुम्हाला फायब्रॉईड असल्याचे निदान झालेले आहे आणि गर्भधारणा होण्यासाठी सर्वोत्तम उपचार पद्धतीचा शोध घेत आहे, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्हाला फायब्रॉईड ची लक्षणे दिसत आहेत आणि तुमचा परिवार अपूर्ण आहे तर कोणते उपचार करावेत हेही आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला मासिक पाळीत असामान्य रक्तस्त्राव, ओटीपोटात वेदना, अधिक दिवस रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष्य करू नका. खासकरून, तुम्ही आई होण्याचा विचार करीत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी लवकरात लवकर संपर्क करा. गर्भाशयातील गाठी म्हणजेच फायब्रॉईड असल्यास अशी लक्षणे दिसतात, जे भविष्यातील वंध्यत्वाचे कारण ठरू शकतात.
परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही. फायब्रॉईड च्या गाठी नॉन कॅन्सरस असतात. सर्जरी ने फायब्रॉईड चा इलाज होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान फायब्रॉईड चे मॉनिटरिंग केल्यास स्वस्थ बाळाचा जन्म होऊ शकतो. तसेच फायब्रॉईड मुळे वंध्यत्व समस्या असल्यास ऍडव्हान्स फर्टिलिटी उपचारांनी फायब्रॉईड स्थितीतही गर्भधारणा होऊ शकते.
फायब्रॉईड चे प्रकार, लक्षण, तुमचे वय यानुसार केले जाणारे उपचार
१) फायब्रॉईडची लक्षणे दिसल्यास काय करावे?
सर्वप्रथम स्त्रीरोगतज्ञ किंवा प्रजनन तज्ञांशी सल्लामसलत करणे महत्वाचे आहे. ते काही चाचण्या करून फायब्रॉईड चे स्थान आणि आकार याचे योग्य निदान करतील. लॅप्रोस्कोपी किंवा हिस्टेरोस्कोपिक सर्जरी च्या मदतीने गाठ काढून टाकली जाते.
२) प्रेग्नन्सी साठी केलेल्या सोनोग्राफीत फायब्रॉईड असल्याचे समजल्यास काय करावे?
बऱ्याचदा फायब्रॉईड त्रासदायक नसतात. फायब्रॉईड असतो पण कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. तुम्ही सहजासहजी कन्सिव्ह करतात. पण हे फायब्रॉईड बाळाच्या वाढीत अडचणी निर्माण करू शकतात. बाळाला होणार रक्तपुरवठा कमी होतो. वाढ खुंटते. किंवा कधीकधी बाळाच्या वाढीबरोबर फायब्रॉईड ची देखील वाढ होऊ लागते, यामुळे बाळाच्या वाढीत अडचण येते.
अशा वेळी तुमचे डॉक्टर औषधे देऊन फायब्रॉईड ची वाढ रोखू शकतात. किंवा वेळोवेळी अशा फायब्रॉईड चे मॉनिटरिंग केले जाते. बाळाची वाढ व्यवस्थित होते आहे का, फायब्रॉईड चे वाढ होते आहे का याची तपासणी केली जाते. गरजेनुसार योग्य तो निर्णय घेतला जातो. फायब्रॉईड ची लक्षणे दिसू लागल्यास किंवा आकार वाढू लागल्यास सर्जरी किंवा ऍबॉर्शन करावे लागू शकते.
फायब्रॉईड मुळे गर्भपाताचा अनुभव असेल, तर मात्र पुढील वेळी फर्टिलिटी डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भधारणा करावी.
३) फायब्रॉईड मुळे गर्भाशयाचे मुख घसरलेले असल्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेत अडचण? असे करा उपचार
जेव्हा फायब्रॉईड गर्भाशयाच्या बाहेर असतो किंवा गर्भाशयाच्या मुखाजवळ असतो तेव्हा गर्भाशयाचे मुख दाबले जाते. संभोग वेदनादायी असल्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेत अडचण येते. याशिवाय काही प्रकरणात अशा फायब्रॉईड मुळे गर्भाशयाचे मुख घसरते. यामुळे वीर्यातील शुक्राणू गर्भाशयात प्रवेश करू शकत नाहीत आणि वंध्यत्व समस्या निर्माण होते. अशा स्थितीत तुमच्यासाठी IUI हा सर्वोत्तम उपचार पर्याय आहे. IUI म्हणजे इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन. या स्थितीत
४) तुम्हाला अपत्ये आहेत आणि फायब्रॉईड मोठे असतील तर असे उपचार केले जातात.
जर तुमचे वय ४० पेक्षा अधिक आहे आणि तुमचा परिवार पूर्ण झालेला आहे. शिवाय फायब्रॉईड च्या गाठी १०, १२, १५ सेंटीमीटर लांबीच्या असतील किंवा अनेक गाठी असतील तर, मात्र डॉक्टर तुम्हाला गर्भपिशवी काढून टाकण्याचा पर्याय सुचवतील. या सर्जिकल उपचार पद्धतीला हिस्टेरेक्टॉमी असे म्हणतात.
५) फायब्रॉईड मुळे गर्भनलिका ब्लॉक असेल तर असे उपचार केले जातात.
फेलोपियन ट्यूब जवळ फायब्रॉईड असेल आणि त्याची वाढ होत असेल तर अशा फायब्रॉईड मुळे गर्भनलिकेवर दबाव येतो. नळी बंद (ब्लॉक) होते. त्यामुळे काय होते तर, शुक्राणू नलिकेत प्रवेश करू शकत नाहीत आणि फर्टिलायझेशन प्रक्रिया होत नाही. पर्याया��े गर्भधारणा होऊ शकत नाही. अशा वंध्यत्व समस्येत डॉक्टर सर्जिकल उपचाराच्या मदतीने फायब्रॉईड काढून टाकतील आणि ओव्यूलेशन इंडक्शन किंवा IUI सारख्या प्राथमिक फर्टिलिटी उपचारांच्या मदतीने गर्भधारणेचा पर्याय सुचवतील. परंतु फायब्रॉईड मुळे ओव्यूलेशन समस्या निर्माण झालेली असल्यास डॉक्टर तुम्हाला गर्भधारणेसाठी IVF उपचार सुचवतील. ज्यामध्ये फेलोपियन ट्यूब बायपास होतात. कारण फर्टिलायझेशन प्रक्रिया लॅब मध्ये होते आणि लॅबमध्ये बनवलेला गर्भ आईच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो.
६) सब-म्युकोजल फायब्रॉईड चे उपचार
सब म्युकोजल म्हणजे गर्भाशयाच्या अस्तरात होणार फायब्रॉईड. हा फायब्रॉईड वाटाण्याच्या आकारापासून ते तारबुजाएवढाही असू शकतो. ४-५ सेमी पेक्षा मोठा असलेला फायब्रॉईड लॅप्रोस्कोपिक सर्जरीच्या मदतीने काढून टाकला जातो. लॅप्रोस्कोपिक सर्जरी सर्वात कमी आक्रमक आणि लवकर रिकव्हरी होणारी सर्जरी आहे.
७) इंट्रा-मुरेल फायब्रॉईड चे उपचार
गर्भाशयाच्या मधल्या भिंतीत (मायोमेट्रियम मध्ये) होणारा फायब्रॉईड म्हणजे इंट्रा-मुरेल फायब्रॉईड. डॉक्टर तुम्हाला कमी आक्रमक सर्जरी पर्याय सुचवू शकतात. तो म्हणजे एम्बोलायझेशन. या प्रक्रियेत फायब्रॉईड ला होणारा रक्तप्रवाह खंडित केला जातो.
८) सब सिरोजल फायब्रॉईड चे उपचार
सबसेरोसल फायब्रॉइड्स हे गर्भाशयाच्या बाहेर च्या लेयर मध्ये (पेरीमेट्रियम) वाढतात. ते गर्भपिशवी किंवा गर्भाशयाच्या मुखावर किंवा पेल्विक क्षेत्रातील इतर अवयांवर दबाव टाकतात. अशा फायब्रॉईड ला काढून टाकणे योग्य असते. सर्वात कमी आक्रमक उपचार म्हणजे MRI मार्गदर्शनानुसार फोकस्ड अल्ट्रासाऊंड (FUS) उपचार केले जाऊ शकतात. यामध्ये उच्च ध्वनी लहरी आणि उच्च ऊर्जा असलेल्या फोकस चा वापर करून फायब्रॉईड नष्ट केला जातो. फायब्रॉईड मधील प्रोटीन नष्ट केले जाते. यामुळे गर्भाशय सुरक्षित राहते.
९) मोठ्या आकाराच्या फायब्रॉईड चा उपचार
जेव्हा फायब्रॉईड खूप मोठा असतो बाहेर काढता येऊ शकत नाही तेव्हा डॉक्टर मॉर्सलेशन उपचार वापरतात. यामध्ये फायब्रॉईड चा आकार लहान केला जातो आणि मग सर्जरी करून काढला जातो.
१०) पेडनक्युलेटेड फायब्रॉइड्स चे उपचार
हे फायब्रॉईड मशरूम च्या आकाराचे, शेपटी असलेले असतात. यामध्ये शेपटीचा भाग वाढतो आणि जेव्हा हे देठ मुरते तेव्हा वेदना होऊ लागतात. या फायब्रॉईड चे उपचार इतर फायब्रॉईड प्रमाणेच सर्जिकल किंवा नॉन सर्जिकल उपचार केले जातात.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन ने फेब्रुवारी २०२३ मध्ये केलेल्या संशोधनानुसार,
- भारतातील २०-४०% महिलांना फायब्रॉईड होतो.
- फायब्रॉईड सह झालेली गर्भधारणा जोखीमीची असते. गर्भधारण-पूर्व, गर्भारपणात आणि गर्भधारण-पश्चात अनेक अडचणी निर्माण करू शकते.
- फायब्रॉईड सह गर्भधारणेत वेळेपूर्वी प्रसूती, सी-सेक्शन डिलिव्हरी किंवा हेवी ब्लीडींग चा धोका असतो. त्यामुळे उपचार अनिवार्य आहेत.
- बहुसंख्य रुग्णांना सब-सिरोजल फायब्रॉईड असून, प्रमाण 71.82% आहे. सब-म्युकोजल फायब्रॉईड चे प्रमाण 20.91% आहे. तर, पेडनक्युलेटेड फायब्रॉइड चे प्रमाण 12.73% आहे.
reference: https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC10051105

