Logo
Latest Blog

फायब्रॉईड मुळे वंध्यत्व? जाणून घ्या फायब्रॉइड समस्या आणि समाधान

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

फायब्रॉईड म्हणजे काय?

फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयातील गाठ. या गाठी मसल्स आणि कनेक्टीव्ह टिश्यूज/स्मूथ टिश्यू पासून बनलेल्या असतात. फायब्रॉइड्सला लायोमायोमाज किंवा युटेरियन फायब्रॉईड असेही म्हणतात.

फायब्रॉईड चा आकार आणि संख्या

फायब्रॉईड वाटाण्याच्या आकारापेक्षा लहान किंवा टरबूजा एवढे मोठेही असू शकतात. एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात. मोठ्या फायब्रॉईड च्या मागे लहान फायब्रॉईड लपलेले असू शकतात. यामुळे सर्जरी नंतरही लहान फायब्रॉईड राहून जाण्याची शक्यता असते.

फायब्रॉईड आणि वंध्यत्व

फायब्रॉइडचा संबंध वंध्यत्वाशी जोडला गेला असला, तरी अद्याप त्याचे कारण ठरवणे कठीण आहे. फायब्रॉईड ट्रीटमेंट घेतल्यानंतर गर्भधारणेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र बरेच आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला मातृत्व प्रदान होऊ शकते.

  • खूप मोठा फायब्रॉईड असेल तर गर्भाशयाचा आकार बदलतो. डिस्टोर्शन मुळे कन्सिव्ह चे चान्सेस कमी होतात.
  • फायब्रॉईड गर्भाशय ग्रीवा जवळ असेल, तर गर्भाशय मुख घसरते. जागेवरून सरकते. संबंधावेळी सीमेन/स्पर्म गर्भाशयात प्रवेश करू शकत नाही. यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होते.
  • जेव्हा फायब्रॉईड गर्भाशयात असेल तेव्हा, एन्डोमेट्रियम ची लेयर पातळ होते आणि गर्भ रुजु शकत नाही.
  • फॅलोपियन ट्यूब जवळ फायब्रॉईड असेल तर नळीवर प्रेशर येते आणि ट्यूब मध्ये तयार झालेला गर्भ गर्भाशयात येण्याच्या मार्गात अडथळा येतो. यामुळे देखील वंध्यत्व येते.

फायब्रॉईड आणि गर्भधारणा

बऱ्याचदा गर्भधारणा राहत नाही तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि सुरुवातीला ट्रान्स व्हजायनल सोनोग्राफी चा सोपस्कार पार पडला जातो. तेव्हा फायब्रॉईड (गर्भशायात गाठ) असल्याचे समजते. किंवा इतर केसेस मध्ये प्रेग्नेंसी दरम्यान केलेल्या सोनोग्राफीत फायब्रॉईड चे निदान होते. परंतु घाबरून जाण्याचे काही कारण नाही; फायब्रॉईड असल्यास गर्भधारणा होत नाही, असे अजिबात नाही. फायब्रॉईड असेल तरी गर्भधारणा होऊ शकते. फायब्रॉईड कुठे आहे यावर ते डिपेंड असते.

कधीकधी गर्भधारणेनंतर फायब्रॉइड्स देखील आकाराने वाढू लागतात. फायब्रॉइड्स आकाराने मोठे असल्यास बाळाची वाढ रोखली जाते. यामुळे जन्माला येणारे बाळ सव्यंग असण्याची शक्यता वाढते. अगदी किरकोळ केसेस मध्ये फायब्रॉईड मुळे प्री-टर्म (वेळेपूर्वी प्रसूती) किंवा सी-सेक्शन (सिजेरियन प्रसूती) चा धोका असतो. त्यामुळे डॉक्टर्स तुमच्या गर्भधारणेत तुमच्या फायब्रॉईड चे वेळोवेळी निरक्षण (monitor) करतात.

फायब्रॉईड चे प्रकार

फायब्रॉईड गर्भाशयाच्या आत किंवा बाहेर कुठेही होऊ शकतो. गर्भाशयात तीन थर असतात. एन्डोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरीमेंट्रीयम/सिरोजल. तीन थरात होणाऱ्या फायब्रॉईड ला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.

१) सब-म्युकोजल फायब्रॉईड : एन्डोमेट्रियम मध्ये म्हणजेच गर्भाशयाच्या सर्वात आतील भागात होणार फायब्रॉईड.
२) इंट्रा-मुरेल फायब्रॉईड : मायोमेट्रियम मध्ये होणार फायब्रॉईड.
३) सब सिरोजल/सिरस फायब्रॉईड :सिरोजल मध्ये किंवा पेरीमेंट्रीयं मध्ये होणार फायब्रॉईड.
४) फेलोपियन ट्यूब जवळ होणार फायब्रॉईड :यामुळे नलिकेवर दबाव येतो आ��ि गर्भधारणेत अडथळे येतात.
फायब्रॉईड चे प्रकार

फायब्रॉईड ची कारणे

  • अतिरिक्त वजन
  • BMI इंडेक्स
  • अनुवांशिक कारणे : कुटुंबात किंवा रक्ताच्या नातेवाईकांत कुणाला फायब्रॉईड असल्यास
  • वंध्यत्व
  • तारुण्यात मासिक पाळी येणे
  • मेनोपॉज उशिरा येणे, गर्भधारणा उशिरा होणे, स्तनपान न करणे यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन फायब्रॉईड होऊ शकतो.
  • फिजिकल ऍक्टिव्हिटी
  • आहार (Diet)
  • वय (Age)
  • हार्मोनल इम्बॅलन्स
  • एंडोक्राइन डिसरप्शन
  • पुअर लाइफस्टाइल
  • प्लास्टिक चा वापर किंवा पर्यावरणीय बदल

तुम्हाला फायब्रॉईड आहे हे कसे ओळखाल?

फायब्रॉईड असेल तर प्रत्येक वेळी लक्षणे किंवा त्रास होतीलच असे नाही. काही फायब्रॉईड सायलेंट असतात. ज्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसत नाही त्यामुळे फायब्रॉईड आहे हे बऱ्याचदा काळतही नाही. आणि फायब्रॉईड ची वाढ होते.

  • युटेरियन वॉल मध्ये लहानसा फायब्रॉईड असेल तरी वेदना होतात.
  • सब सिरस फायब्रॉईड कितीही मोठे असले तरी त्रास होत नाही.
  • हेवी ब्लीडींग : अतिरिक्त आणि वेदनादायी रक्तस्त्राव
  • युरिनरी ब्लॅडर, आतडे, आणि पोटातील इतर अवयांवर प्रेशर येते. वेदना होतात.
  • एन्डोमेट्रियम मध्ये १ सेमी इतका लहान फायब्रॉईड असेल,तरी लवकर लक्षणे दिसून येतात.
  • मासिक पाळीत जास्त प्रमाणात, जास्त दिवस रक्तस्त्राव आणि स्पॉटिंगब होणे.
  • फायब्रॉईड मोठा असल्यास, युटेरस स्ट्रेच होते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान आणि नंतरही वेदना होतात.
  • इन्फर्टिलिटी समस्या
  • मलमूत्र विसर्जनाला त्रास होऊ शकतो. मूत्राशय रिक्त होण्यात अडथळे येतात.
  • वारंवार लघवी होणे
  • सबम्युकस फायब्रॉईड लक्षणे दाखवतात.
  • लैंगिक संबंधावेळी वेदना होणे
  • ब्लोटींग होणे
  • पाठीच्या खालील भागात वेदना होणे
  • कॉन्स्टिपेशन

निदान (Diagnosis)

  • MRI : फायब्रॉईड मॅपिंग साठी MRI वापरला जातो.
  • अल्ट्रासाउंड सोनोग्राफी
  • हिस्टेरोस्कोपी
  • लॅप्रोस्कोपी

उपचार (Treatment)

उपचारांचे ध्येय : युटेरस प्रिसर्व करणे आणि फायब्रॉईड काढणे हे उपचाराचे ध्येय असते.

फायब्रॉईड ची ट्रीटमेंट एकसारखी केली जात नाही. तुम्हाला दिसणारी लक्षणे, लक्षणांची तीव्रता, फायब्रॉईड ची संख्या, फायब्रॉईड चा आकार, तुमचे वय, तुमचे गोल्स काय आहेत, तुमचे कौटुंबिक स्टेटस काय आहे यानुसार ट्रीटमेंट दिली जाते. कोणत्या कंडिशन मध्ये काय उपचार केला जातो ते पाहुयात.

  1. जर, तुमचे वय ४० पेक्षा जास्त असेल, तुमचे कुटुंब पूर्ण झालेले असेल आणि फायब्रॉईड ची संख्या जास्त असेल तर तुम्हाला गर्भपिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. कारण फायब्रॉईड सर्जरी नंतर देखील पुन्हा फायब्रॉईड होऊ शकतात. अर्थात, या प्रकरणात महिलेचा कन्सर्न विचारात घेतला जातो. जर, महिला गर्भपिशवी काढण्यास तयार नसेल तर, मात्र फायब्रॉईड ची सर्जरी केली जाते.
  2. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करून फायब्रॉईड कंट्रोल करता येतो.
  3. औषधोपचार : फायब्रॉईड ची गाठ कधीच औषधांमुळे बारी होऊ शकत नाही. औषधांमुळे फक्त फायब्रॉईड ची साईज कमी होते. औषधे घेणे बंद केल्यास, गाठ पुन्हा वाढू लागते. याशिवाय काही औषधांमुळे लिव्हर फेल्युअर दिसून आल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
  4. जर, फायब्रॉईड ची गाठ ४-५ सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल आणि लक्षणे दिसत नसतील तरी फायब्रॉईड काढून टाकला जातो.
  5. जर, फायब्रॉईड ची गाठ १ सेंटीमीटर पेक्षा लहान आहे आणि महिलेला अधिक लक्षणे दिसत असतील तर मात्र सर्जरी करून फायब्रॉईड काढणे हा एकच पर्याय उरतो.
  6. पूर्वी किती वेळा फायब्रॉईड चे ऑपरेशन केलेले आहे यावर कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची हे अवलंबून असते.
  7. गर्भाशय मुखाजवळ फायब्रॉईड आहे आणि तुम्हाला आई होण्यात अडचणी आहेत, तर IUI उपचार केले जाते.
  8. जर फायब्रॉईड मुळे तुमचे गर्भाशयाचे मुख सरकलेले आहे आणि  त्यामुळे लैंगिक संबंधांवेळी वीर्य गर्भाशयाकडे पोहचू शकत नाही, तेव्हा IUI केले जाते.
  9. फायब्रॉईड काढून टाकण्याचे प्रत्येक वेळी गरज नसते, फायब्रॉईड सहा प्रेग्नेंसी कन्सिव्ह करू शकतो. परंतु नंतर हा फायब्रॉईड बाळाच्या वाढीत अडथळा निर्माण करू शकतो. अशा वेळी प्रेग्नेंसी दरम्यान फायब्रॉईड चे निरीक्षण केले जाते आणि वेळेनुसार निर्णय घेतला जातो.
  10. गर्भाशय ग्रीवा डिस्टोर्ड झाली असेल तर, फायब्रॉईड काढण्याचा सल्ला दिला जातो.
  11. सर्जरी नंतरही कधी कधी नॅचरल कन्सिव्ह होऊ शकत नाही तेव्हा IVF चा सल्ला दिला जातो.
  12. जर, महिलेचे वय ४० + आहे, तिला अपत्य आहेत आणि फायब्रॉईडची साईज १०,१२,१५ सेंटीमीटर वाढलेली असेल तर, गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो.
  13. सर्जरी : सर्जरी साठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

लॅप्रोस्कोपिक सर्जरी : ज्यामध्ये कमी जखम होते, कॉस्मेटोलॉजिकली योग्य असते, वेदना होत नाहीत, पेशंट लगेच घरी जाऊ शकतो. त्यामुळे लॅप्रोस्कोपिक सर्जरी चा पर्याय जास्त स्वीकारला जातो.

युटेरियन आर्टरी एम्बोलायझेशन

  • MRI च्या मार्गदर्शनानुसार 'अल्ट्रासाउंड फोकस्ड अँड रेडिओ-फ्रेक्वेंसी अब्लेशन
  • रेडिओलॉजिकली एम्ब्युलायझेशन
  • मायोमेक्टॉमी सर्जरी
  • हिस्टेरोस्कोपिक मायोमेक्टॉमी

फायब्रॉईड बद्दल अधिक सर्च केले जाणारे प्रश्न:

१) फायब्रॉईड असलेल्या स्त्रियांनी काय काळजी घ्यावी ?

उत्तर : लाल मटन, प्रोसेस फूड खाल्ल्याने शरीरातील मेटाबोलिसम खराब होते. सॅच्युरेटेड फॅट वाढतात आणि वजन वाढते. असा आहार सेवन केल्यामुळे इस्ट्रोजेन या हार्मोन चे प्रमाण वाढते आणि फायब्रॉईड होण्याचा धोका निर्माण होईल. याशिवाय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन (बटर, चीज, दूध) केल्यामुळे देखील इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते. यामुळे फायब्रॉईड होऊ शकतो.

२) फायब्रॉईड म्हणजे कँसर असतो का?

उत्तर : सुदैवाने फायब्रॉईड हा कँसर नसतो. फायब्रॉईड असल्यास तुम्हाला इतर प्रकारचे गर्भाशयाचे कँसर होऊ शकत नाही. फायब्रॉईड एक प्रकारचे ट्युमर असतात. ट्युमर दोन प्रकारचे असतात कंसरास ट्युमर अँड नॉन-कॅन्सरस ट्युमर. फायब्रॉईड नॉन-कॅन्सरस प्रकारात येतात.

३) व्यायामामुळे फायब्रॉइड्स कमी होतात का?

उत्तर : जेव्हा नियमित व्यायामाने BMI इंडेक्स कमी होत असेल तर फायब्रॉईड वाढ आपोआपच नियंत्रित केली जाते. व्यायाम गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सला वाढण्यापासून रोखण्यास मदत करू शकतो; परंतु फायब्रॉईड ची साईज आणि लक्षणे कमी करण्यास मदत होत नाही.

४) फायब्रॉइड्सचा त्रास कोणाला होतो?

उत्तर : स्त्रियांच्या वयानुसार फायब्रॉइड्स अधिक सामान्य होतात. मेनोपॉज येत नाही तोपर्यंत फायब्रॉईड कायम राहतो. विशेषतः 30-40 वयात  रजोनिवृत्तीनंतर फायब्रॉइड्स सहसा कमी होतात. कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता, हार्मोनल इम्बॅलन्स, अयोग्य आहार यांमुळे फायब्रॉइड चा धोका वाढतो.

५) फायब्रॉईड मुळे ऑर्गन डॅमेज होऊ शकतात का?

उत्तर : फायब्रॉइड मूत्रपिंड आणि रक्ताभिसरण खराब करू शकतात.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...
फायब्रॉईड म्हणजे काय? | Fibroid meaning explain in Marathi