Logo
Latest Blog

अस्थानिक गर्भधारणा (एक्टोपिक प्रेग्नेंसी) : प्रकार, लक्षणे, कारणे, निदान आणि उपचार

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

एक्टोपिक प्रेग्नेंसी म्हणजे काय?

एक्टोपिक म्हणजे नॉर्मल लोकेशन च्या बाहेर गर्भधारणा होणे म्हणजे एक्टोपिक प्रेग्नेंसी होय. एक्टोपिक प्रेग्नेंसी चे प्रमाण १५ ते २०% आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ फॅमिली फिजिशियन्स (एएएफपी) आणि अमेरिकन प्रेग्नन्सी अससोसिएशन च्या मते, दर ५० महिल��ंमागे १ महिलेला एक्टोपिक  प्रेग्नेंसी होऊ शकते.

नॉर्मल प्रेग्नन्सी आणि एक्टोपिक प्रेग्नन्सी मधील फरक

एक्टोपिक  प्रेग्नेंसी म्हणजे काय हे जाणून घेणापूर्वी नॉर्मल  प्रेग्नेंसी म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नॉर्मल  प्रेग्नेंसी मध्ये सेक्शुअल इंटरकोर्स नंतर पुरुषांचे स्पर्म स्त्रीच्या गर्भाशयाच्या मार्गाने फॅलोपि नलिकांमध्ये असलेल्या स्त्रीबीजापर्यंत (ओव्युम) प्रवास करतात. यावेळी ओव्युम आणि स्पर्म फर्टाईल होतात आणि भ्रूण तयार होतो. चार ते पाच दिवस हा गर्भ फ्लॉपी नलिकेमध्येच वाढतो. त्यानंतर नलिकेमार्फत सिलिया द्वारे गर्भाशयात ढकलला जातो. गर्भशय्या म्हणजेच एन्डोमेट्रियम मध्ये हा गर्भ रुजतो आणि तिथेच ९ महिने वाढतो. एक्टोपिक  प्रेग्नेंसी मध्ये फर्टिलायझेशन प्रक्रिया सेम असते. मात्र फर्टिलायझेशन नंतर गर्भ गर्भाशयात ढकलला जात नाही. गर्भ एन्डोमेट्रियम मध्ये रुजत नाही तर, फॅलोपियन ट्यूब मध्येच वाढू लागतो. गर्भाशय फ्लेक्सिबल असल्यामुळे गर्भ वाढतो त्याप्रमाणात गर्भाशय वाढत जाते. मात्र फेलोपियन नलिका अगदी बारीक (२ मिमी) असते, ती स्ट्रेच होऊ शकत नाही; परिणामी फेलोपियन नलिका फाटून मोठ्या प्रमाणात ब्लीडींग होण्याचा धोका असतो.

एक्टोपिक प्रेग्नन्सी चे प्रकार

  • ट्युबल प्रेग्नन्सी : फेलोपियन ट्यूब मध्ये होणारी  प्रेग्नेंसी. हि ट्यूब मध्ये चार ठिकाणी होऊ शकते. 
  • Ampullary :अँप्युलॅरी  प्रेग्नेंसी चे प्रमाण ८० % आहे.
  • Isthmic : इस्थमिक  प्रेग्नेंसी चे प्रमाण १२ % आहे.
  • Fimbrial : फिम्ब्रियाल  प्रेग्नेंसी चे प्रमाण ५ % आहे.
  • Coual/Interstitial : कॉर्नोअल  प्रेग्नेंसी चे प्रमाण २ % इतके आहे. 
  • Abdominal : ऍबडॉमिनल  प्रेग्नेंसी हि पोटात गर्भाशयाबाहेर कुठेही होऊ शकते. यालाच सेकंडरी ऍबडॉमिनल  प्रेग्नेंसी असेही म्हणतात. मात्र याचे प्रमाण अगदी कमी आहे. १.२ % आहे.
  • Ovarian :  ओवारीण  प्रेग्नेंसी म्हणजे ओव्हरीज मध्ये होणारी प्रेग्नन्सी. याचे प्रमाण २ % असते. 
  • Cervical : सर्व्हायकल  प्रेग्नेंसी सर्विक्स एरियामध्ये होते. याचे प्रमाण अत्यल्प ०.२ % इतकेच असते.

एक्टोपिक प्रेग्नन्सी एक धोका

डॉक्टरांच्या अनुसार एक्टॉपीक  प्रेग्नेंसी एक धोका आहे. हि एक इमर्जन्सी आहे. मात्र भारतात यासंबंधी फार जनजागृती दिसून येत नाही. किंवा महिला सेकंड, थर्ड ओपिनियन घेण्यात अधिक वेळ दवडताना दिसून येतात. अशी मागणी करतात कि औषधे देऊन किंवा सर्जरी करून उपचार करण्यात यावा. परंतु हे समजून घ्यायला हवे कि एक्टोपिक  प्रेग्नेंसी हि एक ऑपरेशनला इमर्जन्सी असून यावर दुसरा उपाय नाही. यु.के. सारख्या देशांमध्ये एक्टोपिक  प्रेग्नेंसी लाल अक्षरांमध्ये लिहिले जाते. शिवाय हॉस्पिटल मध्ये सायरन वाजवून इमर्जन्सी केस घोषित केली जाते. 

एक्टोपिक प्रेग्नेंसी ची लक्षणे

एक्टोपिक गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे सामान्य गर्भधारणेच्या लक्षणांसारखीच असू शकतात.

  • योनीतून रक्तस्त्राव.
  • ओटीपोट, ओटीपोटाखालील भाग आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होणे
  • चक्कर येणे
  • अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात.

जेव्हा, भ्रूणाची वाढ होऊ लागते आणि फॅलोपियन ट्यूब वरील प्रेशर वाढते तेव्हा अतिरिक्त लक्षणे दिसू लागतात. जसे की,

  • मूर्च्छा येणे
  • ब्लड प्रेशर लो होणे
  • हायपर टेन्शन
  • खांदा दुखणे
  • गुदाशयावर दाब येणे
  • आतड्यांसंबंधी समस्या
  • मळमळ, उलटी होणे किंवा नॉशिया
  • हलकासा रक्तस्त्राव होणे
  • युटेरस मध्ये सूज येते
  • गर्भाशयातील लायनिंग वाढते (डेसिड्युअल रिऍक्शन)
  • जेव्हा, ट्यूब फुटते तेव्हा तीव्र लक्षणे दिसतात. ही एक प्रकारची वैद्यकीय आणीबाणी असते. यामध्ये महिलेच्या जीवाला धोका निर्माण होतो.
  • ट्यूब फुटल्यामुळे पोटात रक्तस्त्राव होऊ लागतो. हे ब्लीडींग खूप जास्त प्रमाणात असते.
  • ओटीपोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना होतात.

एक्टोपिक प्रेग्नेंसीची कारणे

  • एक्टोपिक  प्रेग्नेंसी चा इतिहास : पूर्वी एक्टोपिक  प्रेग्नेंसी चा अनुभव असेल तर, पुन्हा होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण ट्यूब मध्ये प्रॉब्लेम असतो.
  • इन्फेक्शन्स किंवा बर्निंग : सेक्श्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स म्हणजेच लैंगिक संक्रमित संसर्ग यांमुळे एक्टोपिक गर्भधारणेची शक्यता असते. गोनोरिया किंवा क्लॅमिडीया यांसारख्या इन्फेक्शन्स मुळे नलिका आणि इतर जवळच्या अवयवांमध्ये जळजळ होते आणि एक्टोपिक  प्रेग्नेंसी ची शक्यता बळावते.
  • इन्फेक्शन्स इन ट्यूब : ट्युबल इन्फेक्शन्स मुळे देखील एक्टोपिक  प्रेग्नेंसी चा धोका संभवतो. इन्फेक्शन्स मुळे सर्वाधिक एक्टोपिक  प्रेग्नेंसी होतात.
  • Hydroselfix : हायड्रोसिलफीक्स म्हणजे ट्यूब मध्ये पाणी असणे. हे पाणी फॅलोपियन नलिकांद्वारे गर्भाशयात झिरपते. यामुळे गर्भ रुजण्यात अडथळे निर्माण होतात.
  • Tubal Surgery : बंद किंवा खराब झालेले फॅलोपियन ट्यूब दुरुस्त करण्यासाठी ट्यूबल शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे देखील एक्टोपिक गर्भधारणेचा धोका वाढ शकते.
  • IUD चा वापर : गर्भनिरोधक डिव्हायसेस च्या वापरामुळे देखील एक्टोपिक  प्रेग्नेंसी चा धोका असतो. तुम्ही जर, कोपर टी सारख्या डिव्हायसेस चा वापर करत असाल, तर कॉपर टी गर्भाशयाच्या आत बसवलेली असते. यामुळे गर्भाशयात केमिकल चेंजेस होतात, ज्यामुळे गर्भ गर्भाशयापर्यन्त पोहचू शकत नाही. आणि एक्टोपिक गर्भधारणा होते.
  • पेल्विक इंफ्लूमेंटरी डिसीज
  • ट्युबरक्युलॉसिस (TB)
  • फेलोपियन ट्यूब डॅमेज होणे
  • फेलोपियन ट्यूब मध्ये सूज येणे
  • सिलिया डिसीज : सिलिया झिगोत ला गर्भाशयात आणण्याचे काम करते.
  • एन्डोमेट्रिओसिस
  • फर्टीलाइज एग ची ऍबनॉर्मल वाढ होणे
  • Adhesions : अधेशन्स म्हणजे ऑर्गन्स चिकटलेले असणे. यामुळे फॅलोपि ट्यूब ची कार्यक्षमता कमी होते आणि मूव्ह करता येत नाही.
  • Smoking : फॅलोपियन नलिकांमध्ये दोर्यांसारख्या दिसणारे सिलिया असतात जे नलिकेतील गर्भाला गर्भाशयाकडे आणण्याचे काम करीत असतात. स्मोकिंग मुळे सिलिया च्या मुव्हमेंट वर परिणाम होतो. मुव्हमेंट कमी होते. गर्भधारणा होण्यापूर्वी सिगारेट ओढल्याने एक्टोपिक गर्भधारणा होण्याचा धोका वाढू शकतो. तुम्ही जितके जास्त धुम्रपान कराल तितका धोका जास्त. सिलिया मूव्ह करू शकत नाही.
  • नसबंदी शस्त्रक्रिया : अयोग्य वेळात नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास एक्टोपिक प्रेग्नन्सी चा धोका संभवतो. फेलोपियन नलिकेत फर्टिलायझेशन प्रोसेस झालेली असेल आणि नसबंदी शस्त्रक्रिया केली तर ट्युबल प्रेग्नन्सी राहते. गर्भाला गर्भाशयात येण्याचा मार्ग बंद होतो.

एक्टोपिक प्रेग्नेंसी चे निदान

मासिक पाळी चुकल्यास गर्भधारणा झाली आहे कि नाही हे तपासण्यासाठी सर्वसामान्यपणे महिला HCG टेस्ट करतात. रिझल्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांना भेटतात. या भेटीत डॉक्टर व्हजायनल सोनोग्राफी करून गर्भाची स्थिती पाहतात. याचवेळी काही तपासण्या केल्या जातात, तेव्हाच एक्टोपिक गर्भधारणा समजते. अन्यथा सुरुवातीच्या काळात एक्टोपिक गर्भधारणा झालेली असेल हे समजून येत नाही.

  1. व्हजायनल सोनोग्राफी
  2. युरीन टेस्ट्स
  3. ब्लड टेस्ट
  4. अल्ट्रासाउंड
  5. एक्टोपिक प्रेग्नन्सी ची शक्यता वाटल्य��स, फलित अंडी कुठे रोपन झाली आहेत हे तपासण्यासाठी culdocentesis टेस्ट केली जाते.
  6. लॅपरोस्कोपीक सर्जरी

एक्टोपिक प्रेग्नन्सी ट्रीटमेंट

Methotrexate फलित अंडी वाढण्यापासून थांबवण्यासाठी, गर्भधारणा संपवण्यासाठी मेथोट्रेक्झेट नावाचे औषध किंवा इंजेक्शन  दिले जाते. यासाठी काही भेटींची गरज असते, कारण जर एचसीजीची पातळी एका डोसने पुरेशी कमी होत नसेल तर मेथोट्रेक्सेटचे दुसरे इंजेक्शन आवश्यक असते.  मात्र जर तुमची एक्टोपिक  प्रेग्नेंसी ची स्टेज सिव्हिअर असेल तर औषधाचा वापर केला जाऊ शकत नाही. कारण ट्यूब फुटण्याची शक्यता असते आणि ती एक सर्जिकल इमर्जन्सी समजली जाते.
लॅपरोस्कोपिक सर्जरीजर तुमची फॅलोपियन ट्यूब फुटली असेल किंवा तुम्हाला फुटण्याचा धोका असेल, तर एक्टोपिक गर्भधारणा शस्त्रक्रियेने काढून टाकणे हा एकच पर्याय उरतो. कारण मातेचा जीव वाचविणे महत्त्वाचे असते. शस्त्रक्रियेसाठी लॅप्रोस्कोपी चा वापर केला जातो.
salpingectomy (ectopic pregnancy surgery)सर्जरीचा दुसरा वापर म्हणजे बऱ्याचदा तुमची फॅलोपियन ट्यूब काढून टाकण्याचा निर्णय घेतला जातो. कारण पुन्हा एक्टोपिक  प्रेग्नेंसी चा धोका होऊ शकतो. याला सालपिंगेक्टॉमी म्हणतात.
एक्टोपिक प्रेग्नन्सी ट्रीटमेंट

रप्चर्ड आणि अन-रप्चर्ड एक्टोपिक प्रेग्नन्सी

जेव्हा फेलोपियन ट्यूब मध्ये गर्भधारणा होते आणि निदान लवकर झाले नाही तर, नलिका फुटू शकते; याला रप्चर्ड एक्टोपिक  प्रेग्नेंसी म्हणतात. याशिवाय जेव्हा गर्भाशय ग्रीवा, अंडाशय किंवा पोटात इतरत्र गर्भधारणा होते तेव्हा त्याला अन-रप्चर्ड एक्टोपिक  प्रेग्नेंसी म्हणतात. रप्चर्ड एक्टोपिक  प्रेग्नेंसी हि एक सर्गीकल इमर्जन्सी असते, तर अन-रप्चर्ड एक्टोपिक  प्रेग्नेंसी साठी औषधे वापरली जाऊ शकतात. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8926047/

या अभ्यासानुसार २७,५२५ गर्भधारणेत ६४० एक्टोपिक गर्भधारणा होत्या.

रिस्क फॅक्टर्सn (%)
ट्युबेक्टॉमी१.८%
वंध्यत्व१.२%
एक्टोपिक प्रेग्नेंसी चा इतिहास१.४ %
ATT सेवन०.९ %
प्रिव्हिअस लॅपरॉटॉमी   १.४ %
ऍबॉर्शन हिस्टरी२७.३ %
ओटीपोटाचा दाहक रोग३०.२ %
( इन्फेक्शन्स आणि ऍबॉर्शन चा इतिहास असल्या स्त्रियांमध्ये EP जास्त दिसून येते).
Demographic characteristics and clinical presentation of patients with ectopic pregnancies

लक्षणेn (%)
अमेनोरिया९३ %
ऍबडॉमिनल पेन किंवा पोटदुखी८२ %
योनीतुन रक्तस्त्राव५१ %
(अमेनोरिया म्हणजेच अनियमित मासिक पाळी असलेल्या महिलांमध्ये EP चे प्रमाण जास्त आहे.)
वयn (%)
१८-२०१७.९ %
२१-३०४६.४ %
३१-४०  २० %
४० + १५.४ %
(२१ ते ३० वर्ष वयोगटातील स्त्रियांमध्ये EP चे प्रमाण जास्त आहे). 

एक्टोपिक प्रेग्नन्सी बद्दल अधिक सर्च केले जाणारे प्रश्न:

१) एक्टोपिक प्रेग्नन्सी टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ?

उत्तर : एक्टोपिक  प्रेग्नेंसी टाळण्यासाठी स्मोकिंग बंद करा. STI (सेक्श्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स) टाळण्यासाठी कंडोम चा वापर करू शकता. तसेच इतर जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी स्वच्छता ठेवा. 

२) एक्टोपिक प्रेग्नन्सी कशी ओळखावी?

उत्तर : एक्टोपिक गर्भधारणेचे निदान सामान्यतः ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे केले जाते. यामध्ये तुमच्या योनीमध्ये एक लहान प्रोब घातला जातो. प्रोब इतका लहान असतो, की कोणतीही भूल देण्याची गरज नाही.

३) एक्टोपिक लक्षणे कधी सुरू होतात?

उत्तर : एक्टोपिक गर्भधारणेची लक्षणे सामान्यतः गर्भधारणेच्या ४ थ्या आणि १२ व्या आठवड्यांच्या दरम्यान विकसित होतात. काही स्त्रियांना सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. लवकर स्कॅनमध्ये समस्या दिसून येईपर्यंत त्यांना एक्टोपिक गर्भधारणा झाल्याचे समजू शकत नाही किंवा नंतर त्यांना अधिक गंभीर लक्षणे दिसून येतात.

४) एक्टोपिक गर्भधारणेत एचसीजी पातळी किती असते?

उत्तर : β-hCG पातळी 1,500 mIU प्रति एमएल पेक्षा जास्त असेल, आणि ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड तपासणीमध्ये इंट्रायूटेरियन गर्भावस्थेची थैली आढळली नाही, तर एक्टोपिक गर्भधारणेचा संशय येऊ शकतो.

५) एक्टोपिक रक्तस्त्राव कोणत्या रंगाचा असतो ?

उत्तर : योनीतून रक्तस्त्राव, जो काळसर, पाणचट आणि जड, हलका किंवा सामान्य कालावधीपेक्षा जास्त काळ असू शकतो.

६) एक्टोपिक प्रेग्नेंसी चे प्रमुख लक्षण काय ?

उत्तर : एक्टोपिक गर्भधारणा वेदना बहुतेकदा शरीराच्या एका बाजूला स्थित असते.

७) heterotopic pregnancy म्हणजे काय?

उत्तर : हेटरोटोपिक  प्रेग्नेंसी म्हणजे अनेक गर्भधारणेची उपस्थिती. यामध्ये एक गर्भाशयाच्या पोकळीत असते आणि दुसरी गर्भाशयाच्या बाहेर असते. सामान्यतः फॅलोपियन ट्यूबमध्ये असते आणि असामान्यपणे गर्भाशय ग्रीवा किंवा अंडाशयात असते.

८) एक्टोपिक गर्भधारणा किती काळ टिकू शकते?

उत्तर : अखंड एक्टोपिक ट्यूबल गर्भधारणा गर्भधारणेच्या 14 व्या आठवड्यापर्यंत टिकू शकते. यापेक्षा जास्त राहू शकत नाही कारण ट्यूब फटू शकते.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...