गर्भाशयातून योनी मार्गाद्वारे रक्तस्त्राव होऊ लागतो. यावेळी अनावश्यक टिशू अथवा ऊती रक्तस्रावासोबत बाहेर टाकले जातात. याला मासिक पाळी असे म्हटले जाते.
मासिक पाळी चक्र कोणत्या वयात सुरु होते?
साधारणपणे १२ ते १५ वर्षात मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. १६ व्या वर्षापर्यंत पाळी न आल्यास स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
मासिक पाळीत काय त्रास होतात?
- मळमळ होणे
- पोटात वेदना होणे
- थकवा येणे
- तोंड कोरडे पडणे
- रक्तस्रावातून पेटके
- डोकेदुखी
- चिडचिडेपणा
- मूड स्विंग
- ताणतणाव अनुभवणे
मासिक पाळीच्या काळात व्यायाम करावा का?
हो. मासिक पाळीच्या काळात व्यायाम करणे फायदेशीर ठरते. मात्र अतिरिक्त व्यायाम टाळावा.
मासिक पाळी येण्यासाठी कोणत्या गोळ्या घ्याव्यात?
मासिक पाळी येण्यासाठी कोणत्याही गोळ्या उपलब्ध नाहीत. तरी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मासिक पाळी न आल्यास काय करावे?
मासिक पाळी न आल्यास गर्भधारणेचे पहिले लक्षण समजावे. गर्भधारणा तपासणी निगेटिव्ह असल्यास औषधांचे सेवन, बदलेली जीवनशैली, हार्मोनल इम्बॅलन्स इ. कारणांमुळे मासिक पाळी उशिरा येऊ शकते.
मासिक पाळी बंद झाल्यानंतरही गर्भधारणा राहू शकते का?
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेनोपॉज नंतरही गर्भधारणा शक्य आहे. अंडबीजे फ्रिज करून ठेवलेली असल्यास हवी तेव्हा गर्भधारणा शक्य होते.