जेव्हा फर्टिलिटी टेस्ट आणि इतर मेडिकल टेस्ट्स करून देखील कपल्स च्या इन्फर्टिलिटीचे कारण स्पष्टपणे सांगता येत नाही, तेव्हा अशा केसेस ला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी समस्या म्हणतात. जरी वंध्यत्वाचे स्पष्ट निदान झाले नाही, तरीदेखील अशा केसेस मध्ये कन्सिव्ह करण्याचे चान्सेस जास्त असतात. आहार आणि जीवनशैलीत काहीसा बदल, फर्टिलिटी मेडिसिन्स आणि IUI किंवा IVF उपचारांच्या मदतीने गर्भधारणा होऊ शकते.
‘अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी’ म्हणजे काय?
What is Unexplained infertility? – वंध्यत्वाच्या एक प्रकारच्या समस्येला हेल्थकेअर प्रोव्हायडर्स ”अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी” असे म्हणतात. जेव्हा अनेक वैद्यकीय तपासण्या करून देखील डॉक्टर तुमच्या फर्टिलिटी समस्येचे स्पष्ट कारण सांगू शकत नाहीत तेव्हा अशा केसेस ला ‘अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी’ म्हटले जाते.
पुरुष आणि स्त्री जोडीदाराच्या सर्व तपासण्या केल्यानंतरच डॉक्टर ‘अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी’ असे निदान करतात. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
तुमच्या गर्भाशयात कोणताही रचनात्मक (structural) प्रॉब्लेम दिसून येत नाही.
तुमच्या गर्भाशयात कोणताही कार्यात्मक बिघाड (Functional Impairment) दिसून येत नाही.
ओवुलेशन देखील नियमित होत असते.
तुमच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये कोणतेही ब्लॉकेजेस किंवा ऑब्स्ट्रक्शन्स दिसून येत नाहीत. फेलोपियन नलिका उघड्या असतात.
हिस्टेरोसॅल्पिंगोग्राफी किंवा लेप्रोस्कोपी च्या मदतीने तपासणी केल्यानंतर ट्युबल पॅटन्सी नॉर्मल असल्याचे दिसून येते.
तुमच्या ओव्हरीज मधील स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता (eggs count and quality) उत्तम असते.
कोणतीही हार्मोनल समस्या दिसून येत नाही. तुमचा मेंदू रिप्रॉडक्शन साठी आवश्यक असलेले सर्व हार्मोन्स नियमत प्रोड्युस करीत असतो.
तुमच्या पुरुष जोडीदाराचे सीमेन एनालिसिस टेस्ट देखील नॉर्मल असते. स्पर्म्स ची संख्या, स्पर्म प्रोडक्शन, स्पर्म चा आकार, स्पर्म ची गतिशीलता, स्पर्म्स ची हालचाल नॉर्मल असल्याचे दिसून येते.
नॉर्मल ओव्यूलेटरी फंक्शन चेक करताना, बसाल बॉडी टेम्परेचर, ग्रीवा श्लेष्म्यात बदल (सार्विकल म्युकस चेंजेस) दिसून येतो, ल्युटेनायझिंग हार्मोन (LH) पातळीत वाढ झालेली दिसून येते. फॉलिक्युलर रॅपचर झाल्याचे दिसून येते. प्रोजेस्टेरॉन ची पातळी काहीशी वाढलेली असते. हि सर्व लक्षणे तुमची रोप्रोडक्टीव्ह सिस्टीम नॉर्मल असल्याचे दर्शवतात.
”अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी” केसेस मध्ये खालील घटक जबाबदार असू शकतात.
१)सूक्ष्म पुनरुत्पादक विकृती (subtle reproductive abnormalities) : वंध्यत्व समस्येचे अतिशय सूक्ष्म पद्धतीने निदान करू शकतील अशा अडवान्सड टेस्ट्स दुर्मिळ स्वरूपात उपलब्ध आहेत. या प्रगत चाचण्या वंध्यत्वाचे निदान करू शकतात.अशा अडवान्सड आणि एक्सपेन्सिव्ह टेस्ट्स केवळ संशोधनासाठी वापरल्या जातात.
२)एंडोक्राइन डिसऑर्डर (Endocrine Disorder) : ‘एंडोक्राइन सिस्टिम’ ही शरीरातील सर्व ग्लॅन्डस चे कार्य नियंत्रित ठेवत असते. ग्लॅन्डस अनेक प्रकारचे हार्मोन तयार करतात आणि शरीराचे कार्य नियंत्रित करीत असतात. यामध्ये रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन्स चाही समावेश असतो. एंडोक्राइन सिस्टीम मध्ये बिघाड असल्यास, अनेक प्रकारचे हार्मोनल आजार किंवा अंतःस्त्रावी आजार किंवा हार्मोनल इम्बॅलन्स ची समस्या होऊ शकते. ‘एंडोक्राइन डिसऑर्डर’ मूल होण्याची यंत्रणा (reproductive system) प्रभावित करतात आणि अडथळा निर्माण करतात.
३) सर्विकल म्युकस (cervical mucus) : सर्विकल म्युकस म्हणजेच गर्भाशय ग्रिव्यातील श्लेष्मा, स्पर्म ला स्त्रीबीजापर्यंत पोहून जाण्यात मदत करतो. जर सर्विकल म्युकस जाड असेल किंवा त्यात काही घटक असतील, तर स्पर्म्स तुमच्या गर्भाशयात आणि योनीतून प्रवास करू शकत नाहीत. हे देखील ‘अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी’ चे कारण असू शकते.
४) इम्यूनोलॉजिकल डिसऑर्डर (रोगप्रतिकारक विकार) : इम्युनोलॉजिकल डिसऑर्डर हि समस्या शरीरातील इम्युनिटी सिस्टीम (रोगप्रतिकारक शक्ती) ला प्रभावित करीत असते. यामुळे अनेक प्रकारचे आजार किंवा इन्फेक्शन्स होण्याचा धोका वाढतो. हि स्थिती गर्भधारणेत व्यत्यय आणू शकते शिवाय यामुळे गर्भाला हानी पोहचू शकते.
५) मिनिमल किंवा माईल्ड स्वरूपाचा एन्डोमेट्रिओसिस : कोणतीही लक्षणे नसलेला माईल्ड किंवा मॉडरेट स्वरूपाचा एन्डोमेट्रिओसिस वंध्यत्वाचे कारण असू शकतो.
६) अनुवांशिक आजार (Genetic Disorder)
७) कॉम्प्रोमाइज्ड ओवॅरियन रिझर्व्हड (Compromised Ovarian Reserved) : या टेस्ट मध्ये डॉक्टर स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता तपासतात. ओव्हरीयन रिझर्व्हड कमी असल्यास वंध्यत्व येऊ शकते. महिलेची ओव्हरीयन सर्जरी झालेली असणे, गोन्डोटॉक्सिक थेरपी घेतलेली असेल किंवा महिलेचे वय जास्त असेल तर, ओव्हरीयन रिझर्व्हड कमी दिसून येतो. ज्या महिलांचा ओव्हरीयन रिझर्व्हड कमी आहे त्यांना नियमित मासिक पाळी येते आणि ओवुलेशन चे प्रमाण देखील नॉर्मल असते; परंतु ‘ओवुलेशन इंडक्शन’ उपचारांना (ovulation Induction) मिळणारा प्रतिसाद कमी असतो.
सिरम FSH
फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH) टेस्ट करण्यापूर्वी महिलांनी मागील २ महिन्यात कोणतेही गर्भनिरोधक हार्मोनल औषधे घेतलेली नसावीत. 10-20 IU/ml पेक्षा FSH पातळी (>10-20 IU/ml) कमी असणे म्हणजे ओवॅरियन रिझर्व्ह कमी असणे किंवा ओव्हरीज निकामी असण्याचे लक्षण आहे.
सिरम AMH
AMH हार्मोन गर्भधारणेसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. मासिक पाळी चक्राच्या कोणत्याही टप्प्यात AMH टेस्ट करता येऊ शकते. AMH पातळी 1-2ng/ml पेक्षा जास्त असणे ( <1-2ng/ml) म्हणजे ओवॅरियन रिस्पॉन्स खराब असल्याचे लक्षण असते.
अँट्रल फॉलिक्युलर काउंट
ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडद्वारे तपासणी केली असता दोन्ही ओव्हरीज मध्ये फॉलिक्युलर ची बेरीज २-९मिमी इतकी असणे आवश्यक असते. दोन्ही ओव्हरीज मधील फॉलिक्युलर ची बेरीज ३-६ पेक्षा कमी असल्यास (<3-6) ओवॅरियन रिस्पॉन्स खराब असल्याचे लक्षण आहे.
ओव्हरीयन रिझर्व्हड तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या चाचण्या
८) निदान न झालेले इतर शारीरिक आजार : सेलिआक रोग (ग्लूटेन ऍलर्जी), मधुमेह आणि थायरॉईडची परिस्थिती वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकते.
९) स्त्रीबीज आणि स्पर्म्स ची क्वालिटी : अल्ट्रासाउंड आणि ब्लड टेस्ट तुमच्या स्त्रीबीजाच्या गुणवत्तेविषयी (quality) संकेत देऊ शकतात. परंतु ओवुम क्वालिटी चे सूक्ष्मरीत्या निदान करू शकत नाही. त्याचप्रमाणे स्पर्म्स ची क्वालिटी मेजर करण्यासाठी सीमेन अनालिसिस टेस्ट केली जाते. पण सीमेन अनालिसिस फक्त स्पर्म्स च्या क्वालिटीविषयी सांगू शकते. इतर सूक्ष्म समस्या असू शकतात ज्या Unexplained Infertility चे कारण बानू शकतात, त्यांचे निदान करणे शक्य होत नाही.
१०) अयोग्य वेळी इंटरकोर्स : ओवुलेशन पिरिएड मध्ये जेव्हा स्त्रीबीज फर्टीलाइज होतात तेव्हा, सेक्श्युअल इंटरकोर्स न झाल्यास किंवा सेक्श्युअल इंटरकोर्स ची वारंवारिता कमी असेल तरीदेखील Unexplained Infertility समस्या येऊ शकते.
वंध्यत्व समस्येचे निदान करणे कठीण झाले आहे? उपचारांना यश मिळत नाही?… तर तुमची केस अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी ची असू शकते.
अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी चे निदान केव्हा, कसे केले जाते ?
बेसिक टेस्ट्स : सुरुवातीला वंध्यत्व समस्येसाठी खालील बेसिक टेस्ट्स केल्या जातात. यामध्ये निदान होऊ शकले नाही तर ऍडवान्सड टेस्ट्स केल्या जातात.
सीमेन अनालिसिस
सीमेन एनेलीसीस हि पुरुष वंध्यत्वासाठी केली जाणारी तपासणी आहे. यामध्ये पुरुषांचे सीमेन कलेक्ट करून स्पर्म ची मोटिलिटी, मॉर्फोलॉजि, स्पर्म काउंट, स्पर्म प्रोडक्शन, स्पर्म कॉन्सन्ट्रेशन तपासले जाते.
सोनोग्राफी कलर डॉप्लर
डॉपलर अल्ट्रासाऊंड तपासणीमध्ये ओव्हरीज, युटेरस आणि एंडोमेट्रियल मधील ब्लड फ्लो तपासला जातो.
ब्लड टेस्ट्स
थायरॉईड आणि प्रोलॅक्टिन लेव्हल, मॅक्सिमम टेस्ट मध्ये स्थिती नॉर्मल दिसून येत असते.
Basic Tests
अडवान्सड टेस्ट्स : जेव्हा इन्फर्टिलिटी चे कारण आपल्याला बेसिक टेस्ट मध्ये मिळून येत नाही, तेव्हा ऍडवान्सड टेस्ट्स च्या मदतीने बऱ्याच कपल्स मधील काहीना काही कारण मिळून येते. त्यावर आधारित उपचार केल्यास लवकरात लवकर पॉजिटीव्ह रिझल्ट मिळू शकतात.
Tests
Benefits
स्पर्म्स फंक्शन टेस्ट
यामुळे स्पर्म ची फर्टाईल कॅपॅसिटी समजून येते.
स्पर्म्स सर्वायवल टेस्ट
यामध्ये असे कळून येते की, स्पर्म शारीबाहेर काढल्यास किती वेळ सर्वाइव्ह करू शकतात किंवा किती वेळ स्पर्म्स ची मोटिलिटी टिकून राहू शकते.
डिटेल सोनोग्राफी
यामध्ये युटेरस मधील अडेनोमायोसीस ची स्थिती (गर्भाशयातील सूज), अधेशन्स (दोन अवयव चिटकलेले असणे), एन्डोमेट्रिओसिस ची स्थिती तपासली जाते. सिव्हिअर डिस्मेनोरिया म्हणजेच मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटात अतिशय वेदना होत असतील तर, माईल्ड किंवा मॉडरेट एन्डोमेट्रिओसिस ची शक्यता असते.
हिस्ट्रोसॅलपिंगोग्राफी, सोनोसालपिंगोग्राफी आणि हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी
या तीनही अडवान्सड टेस्टच्या मदतीने फेलोपियन नलिकांची सूक्ष्म स्थिती पाहणे शक्य होते. फेलोपियन ट्यूब्ज च्या ओपन असण्याचे स्टेटस, स्टेटस पॅटन्सी हे देखील तपासले जाते.
स्पर्म डी.एन.ए. फ्रॅगमेंटेशन
वरील सर्व टेस्ट केल्यानंतरही वंध्यत्व समस्येचे निदान होऊ शकत नाही; तेव्हा स्पर्म ऍडवान्सड टेस्ट्स केल्या जातात. ज्यामध्ये स्पर्म डी.एन.ए. फ्रॅगमेंटेशन टेस्ट केली जाते.
Y-Cromosom Microdeletion
Y क्रोमोसोम मायक्रोडेलेशन (YCM) हे Y गुणसूत्रातील काही जीन्स गहाळ झाल्यामुळे किंवा जीन्स चा विकास न झाल्यामुळे काही अनुवांशिक आजार तयार होतात; त्यांना ‘Y क्रोमोसोम मायक्रोडेलेशन’ म्हणतात. हे स्पर्म्स मध्ये बिघाडाचे एक कारण असते. स्पर्म्स कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही त्यामुळे पुरुष वंध्यत्व निर्माण होऊ शकते.
केरिओटायपिंग
तुमच्या सेल्स मधील क्रोमोझोन ची संख्या (४६ जोड्या) तपासली जाते. कमी किंवा जास्त संख्या असेल तर इंफेर्टीलिटी समस्या किंवा बाळाच्या विकासासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.
AMH टेस्ट
AMH किंवा अँटी-मुलेरियन हार्मोन या टेस्ट द्वारे ओवरीयन रिझर्व्ह (स्त्रीबीजांची संख्या) तपासला जातो. लो AMH लेव्हल इन्फर्टिलिटीचे कारण असू शकते.
Advanced Tests
अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी चे उपचार
Unexplained Infertility केसेस मध्ये ट्रीटमेंट प्लॅन करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घेणे योग्य ठरते. जसे कि, महिलेचे वय किती आहे, लग्नाला किती कालावधी झालेला आहे आणि बाळ होण्यासाठी किती कालावधीपासून सक्रियरित्या प्रयत्न करीत आहेत, ovarian reserved म्हणजेच स्त्रीबीजांची संख्या किती व क्वालिटी कशी आहे.
१) ओव्यूलेशन इंडक्शन आणि प्लॅन सेक्श्युअल रिलेशन
जेव्हा कपल तरुण आहे आणि महिलेचं वय ३० पेक्षा कमी आहे, लग्नाला ३ वर्ष पूर्ण झालेले नाहीत, शिवाय ovarian reserve नॉर्मल रेंज असेल तर, अशा केसेस मध्ये “बेसिक ट्रीटमेंट प्लॅन” करून देखील यश मिळू शकते. ”ओव्यूलेशन इंडक्शन” आणि ”प्लॅनसेक्श्युअल रिलेशन” या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये ओवुलेशन इंडक्शन च्या मदतीने स्त्रीबीजांची वाढ वेळोवेळी सोनोग्राफीद्वारे तपासली जाते. स्त्रीबीज ओव्यूलेट झाल्याचे या तपासणीत दिसल्यानंतर योग्य वेळी सेक्श्युअल इंटरकोर्स साठी सांगितलं जातं.
२) IUI (इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन)
बेसिक उपचारांतून रिझल्ट मिळत नाही तेव्हा, एक पाऊल पुढे जाऊन IUI ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला जातो. IUI उपचारांमध्ये पुरुषांचे स्पर्म्स कलेक्शन करून स्पर्म वॉशिंग करून नंतर स्त्रीच्या गर्भनलिकेपर्यंत सोडले जातात. यामुळे नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा १०-१५ टक्के प्रेग्नेंसी चान्सेस वाढतात.
३) IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन)
जेव्हा महिलेचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त असेल, ovarian reserve कमी झालेला असेल, लग्नाला ३ वर्षांहून अधिक कालावधी झालेला असेल, IUI ट्रीटमेंट फेल होत असतील, AMH लेव्हल म्हणजेच गर्भधारणेत पूरक असलेल्या ‘अँटी-म्यूलेरियम हार्मोन’ ची पातळी कमी झालेली असेल, स्त्रीबीजांची क्वालिटी घसरलेली असेल तर, अशा वेळी IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन फायदेशीर ठरते. या प्रक्रियेमध्ये लॅब मधील इन्क्युबेटर मध्ये स्पर्म आणि ओवुम फर्टीलाइज केले जातात आणि तयार केलेला एम्ब्रियो युटेरस मध्ये ट्रान्सफर केला जातो.
४) आधुनिक ART तंत्रज्ञान
IUI आणि IVF हे देखील ART तंत्रज्ञान आहेत. आधुनिक IVF उपचार पद्धती जसे कि ICSI, IMSI, PICSI, TESE, PESA, MESA, TESA यांच्या वापराने यशस्वी गर्भधारणा होऊ शकते.
५) मेडिकेशन्स आणि लाइफस्टाइल मॉडिफिकेशन्स
यामध्ये पुनरुत्पादक औषधांसोबतच कपल्स ला संतुलित आहार, व्यायाम, व्यसने, अल्कोहोल अजम्पशन आणि इतर अयोग्य सवयी बदलण्यास सांगितले जाते, वजन नियंत्रित करण्यास पूरक लाइफस्टाइल सुचविले जाते. कारण Unexplained Infertility केसेस मध्ये इन्फर्टिलिटी चे कारण स्पष्ट नसते आणि हे सूक्ष्म बदल कंसीविंग प्रभावित करण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणेत लाइफस्टाइल मॉडिफिकेशन चा रोल महत्त्वाचा असतो.
६) इंटरकोर्स ची वेळ, वारंवारिता आणि ओवुलेशन इंडक्शन
एनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी केसेस मध्ये इंटरकोर्स ची फ्रिक्वेन्सी जास्त ठेवल्यास तुमचे कन्सिव्ह चान्सेस वाढतात. त्यासाठी ओवुलेशन कॅलेंडर, ओवुलेशन प्रेडिक्टर किट इत्यादी साधनांचा वापर करून तुमची ‘ओवुलेशन विंडो’ ओळखावी आणि योग्य वेळी इंटरकोर्स करावा.
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न
१) अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी सह गर्भधारणा शक्य आहे का?
उत्तर : होय. ”अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी समस्या असेल तर गर्भधारणा शक्य आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (NIH) ने दिलेल्या आकडेवारीनुसार अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी समस्या असलेल्या आणि फर्टिलिटी ट्रीटमेंट घेत असलेल्या ९२ % कपल्स ला गर्भधारणा झालेली आहे. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी निदानाचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या बाळाची स्वप्ने सोडून द्यावीत. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी केसेस मध्ये प्रगत ART तंत्रज्ञान म्हणजेच सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भधारणा शक्य आहे.
२) सर्वकाही सामान्य असताना मी गर्भवती का होत नाही?
उत्तर : प्रजनन समस्या. फिझिकल इलनेस, जसे की ओबेसिटी, एनोरेक्सिया नर्वोसा, ओव्हर एक्सरसाइज, रिप्रॉडक्टिव्ह ट्रक डिसीजेस, इन्फेक्शन्स (STI, RTI), ब्लॉक्ड फॅलोपियन ट्यूब, एंडोमेट्रिओसिस किंवा लो स्पर्म काऊंट, मेनोपॉज, पुअर लाईफ स्टाईल, अनेक प्रकारची व्यसने इ. कारणांमुळे अस्पष्ट वंध्यत्व समस्या निर्माण होऊ शकते.
३) अस्पष्ट वंध्यत्वासाठी IUI किंवा IVF चांगले आहे का?
उत्तर : IUI हि unexplained infertility साठी फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणवली जाते. परंतु महिलेचे वय ३० पेक्षा कमी असेल, ovarian reserve कमी असेल, किंवा लग्नाला ३ पेक्षा जास्त वर्ष झालेले असतील, IUI उपचार अयशस्वी ठरले असतील; तर अशा परिस्थितीत IVF उपचारांना प्राधान्य दिले जाते. दोन्हीही उपचारांना यश मिळू शकते. फक्त पर्सोनालाईज्ड डिग्नोसिस नुसार निर्णय घेतला जातो.
Unexplained Infertility – Causes & Treatment in Marathi | Progenesis IVF
Progenesis IVF
Progenesis IVF is the most successful IVF chain, having advanced fertility clinics in India. Creating miracles of birth since the past 40+ years, Progenesis team of fertility specialists has achieved the milestone of 6,000+ successful IVF pregnancies worldwide. With a whooping IVF success rate of 70-80%.
Contact : +91 942 397 1620 / +91 703 094 4041