Pregnancy after menopause in Marathi:
चाळीशीनंतर कोणत्याही महिलेच्या मनात मेनोपॉज बाबत प्रश्न किंवा चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे, आणि जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर हि चिंता अधिक वाढते.
याचं कारण म्हणजे महिलांची प्रजनन क्षमता नैसर्गिकरित्या त्यांच्या वयानुसार कमी होते आणि 40 वर्षानंतर, रजोनिवृत्तीमुळे (मेनोपॉज मुळे), त्यांच्यासाठी यशस्वी रित्या गर्भधारणा राहणे कठीण होते.
पण याचा अर्थ मेनोपॉज नंतर गर्भधारणा “अशक्य” आहे, असं नाही!
प्रगत फर्टिलिटी तंत्रज्ञानामुळे, IVF सारख्या सहाय्यक फर्टिलिटी ट्रीटमेंट्स चा वापर करून मेनोपॉजनंतरही यशस्वी गर्भधारणा शक्य आहे.
अधिक माहिती पुढील ब्लॉग मध्ये.
रजोनिवृत्ती/ मेनोपॉज म्हणजे काय? (Menopause mhanje kay)
मेनोपॉज ही महिलांच्या वयाप्रमाणे reproductive hormones मध्ये होणारी नैसर्गिक घट आहे. बहुतेक स्त्रियांमध्ये मेनोपॉज वयाच्या ४५ शी नंतर येतो. या काळात स्त्रियांच्या अंडाशयात हार्मोन्स तयार होणे थांबते आणि मासिक पाळी सुद्धा थांबते, परिणामी महिलांमध्ये गर्भधारणेची क्षमता नाहीशी होते.
मेनोपॉझ कोणत्या वयात होतो? (Menopause kontya vayat yeto)
मेनोपॉझ सामान्यपणे ४५ शी ते ५५ वया पर्यंत होते. सोबतच, या दरम्यान बहुतेक महिलांना हार्मोनल बदल देखील होतात.
परंतु काही प्रकरणांमध्ये, जेथे स्त्रियांना विशिष्ट आरोग्यविषयक परिस्थिती असते, किंवा त्यांच्यावर विशिष्ट प्रकारचे वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया झाल्या असतात या महिलांमध्ये मेनोपॉज ची सुरवात ३५शी नंतर देखील होऊ शकते, याला अकाली रजोनिवृत्ती किंवा प्री मेनोपॉज असे म्हणतात, ज्यामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व येते.
मेनोपॉज ची लक्षणे (Menopause chi lakshane)
मेनोपॉजच्या वेळी जाणवणारी लक्षणे जशी ‘बिन बुलाये मेहमान’. प्रत्येक स्त्री मध्ये हि लक्षणे वेग वेगळी जरी असली तरी तेव्हढीच त्रासदायक असतात. मासिक पाळी वगळता प्री मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज यातली इतर लक्षणे सारखी असतात:
प्री मेनोपॉज ची लक्षणे. (Premenopause chi lakshane)
- अनियमित मासिक पाळी.
- नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात होणारा मासिक पाळीचा स्त्राव.
मेनोपॉज ची लक्षणे (Menopause chi lakshane)
- ७५% महिलांना शरीरातून उष्णता निघण्याचा भास होतो.
- झोप न येणे
- नैराश्य
- वजन वाढणे
- तोंड डोळे व त्वचा कोरडी पडणे
- डोकेदुखी
- हृदयात धडधड
- युरिनल इन्फेकशन
- केस गळणे किंवा कमकुवत होणे
- चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर व पाठीवरचे केस वाढणे
- दुखरे स्तन किंव्हा स्तनांचा आकार कमी होणे
मेनोपॉझ आणि नैसर्गिक गर्भधारणा
मेनोपॉझ नंतर नैसर्गिक रित्या गर्भधारणा राहणे अशक्य आहे कारण स्त्रियांच्या अंडाशयात अंडी तयार होणं बंद होत.
म्हणूनच जर तुम्ही तुमच्या ४०शीत आहात, बाळासाठी प्रयत्न करत असाल, आणि मेनोपॉझ ची लक्षण अनुभवत असाल तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डॉ. नरहरी मळगांवकर यांच्या मते, “मेनोपॉझ नंतर गर्भधारणेसाठी योग्य फर्टिलिटी क्लिनिक निवडणे आवश्यक आहे, कारण तज्ञ डॉक्टरांची योग्य टीम तुम्ही खरोखर रजोनिवृत्तीतून जात आहात की नाही हे शोधण्यासाठी मदत करू शकते. यासोबतच तुमच्या परिस्थितीसाठी चे योग्य उपचार पर्याय निर्धारित करून आयव्हीएफ च्या यशाची हमी देखील देऊ शकतात.”
४० शी नंतर गर्भधारणा राहिल्यास अनुवंशिक विकाराचा धोका (40 shi nantar gardharna rahilyas anuvanshik vikarancha dhoka)
४० शी नंतर गर्भधारणा राहिल्यास बहुतेकदा मुलांमध्ये जन्मजात अनुवांशिक विकारांचे प्रमाण जास्त असते. यासाठीच IVF प्रक्रियेत प्री-इम्प्लांटेशन चाचणी किंवा PGT ही प्रक्रिया वापरली जाते.
या केसेस मध्ये भ्रूण बायोप्सी केली जाते, याचा फायदा असा कि हे डाउन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम, यासारख्या परिस्थितींची ओळख करून ते भ्रूण अनुवांशिक मेकअपसह काढून टाकण्यास मदत करते.
या सोबतच दुसऱ्या गोष्टींचा धोका आहे, जसे:
- जास्त उल्ट्या होणे किंवा मळमळणे
- प्लेसेंटाचे तोंड अर्धवट किंवा पूर्णपणे झाकून जाणे, ज्यामुळे गर्भधारणेनंतर रक्तस्त्राव होतो.
- गर्भावस्थेत मधुमेह
- गर्भावस्थेत उच्च रक्तदाब
- प्रसूतीनंतर अधिक रक्तस्त्राव
मेनोपॉज नंतर गर्भधारणा (Menopause nantar garbhdharna)
आयव्हीएफ च्या मदतीने गर्भधारणा राहणे शक्य आहे !
कसं?
मेनोपॉज नंतर गर्भधारणा (pregnancy after menopause) ART technique जसे IVF द्वारे करता येते, यासाठी पहिले तर महिलांमध्ये मासिक पाळी पुन्हा सुरू करण्यासाठी दोन ते तीन महिने हार्मोनल गोळ्या दिल्या जातात.
या संदर्भात अधिक सांगतांना डॉ. नरहरी मळगांवकर म्हणतात, “बऱ्याचदा वयाच्या ४० शी नंतर स्त्रियांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि लठ्ठपणा असे अनेक आजार उद्भवू शकतात. आयव्हीएफ आधी आणि दरम्यान संबंधित डॉक्टर शी याची तपासणी करून हे आजार नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.”
यासोबतच
बीजदान, एम्ब्रियोदान, किंवा तुमचे स्वतः चे गोठवलेले एग्ज वापरून गर्भधारणा शक्य आहे.
हि प्रक्रिया कशी कार्य करते?
बीजदान(egg donation): या IVF (ICSI) प्रक्रियेत डोनर एग सोबत तुमच्या जोडीदाराच्या शुक्राणू च मिलन कृत्रिमरित्या केलं जात. ज्यांनंतर ते विकसनशील भ्रूण गर्भाशयात हस्तांतरित केले जातात.
भ्रूण दान (embryo donation): जेव्हा जोडपे IVF तंत्रज्ञानाद्वारे स्वतःची अंडी आणि शुक्राणू वापरून गर्भधारणा करू शकत नाहीत तेव्हा भ्रूण दानाचा उपयोग केला जातो. या प्रक्रियेत, डोनर एग आणि स्पर्म कृत्रिमरित्या IVF द्वारे प्रयोगशाळेत संवर्धन केले जाते आणि निरोगी भ्रूण गर्भाशयात हस्तांतरित केले जातात.
स्त्रीबीज गोठवणे (cryopreservation): आजकाल स्त्रिया पूर्वीपेक्षा नंतरच्या आयुष्यात आई बनणं पसंत करत आहे. अंडी गोठवण्यामुळे स्त्रीला गर्भधारणेचा निर्णय पुढे सुद्धा ढकलता येतो, कारण ही प्रक्रिया अंडी संपण्याआधी जतन करण्याची संधी देते.
वय ही मर्यादा नाही, मेनोपॉझ म्हणजे शेवट नाही.
तुम्ही मेनोपॉझमध्ये आहात याचा अर्थ तुम्ही आई होऊ शकत नाही, असा होत नाही.
भविष्यात कोणतीही कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी, योग्य फर्टिलिटी डॉक्टरांशी बोलणे आणि योग्य वयातच तुमची फर्टिलिटी तपासणे आवश्यक आहे.
बर्याच जणांना ५०साव्या वर्षी मेनोपॉझ येतो, परंतु काहीजणांना ४०शीत येतो . हे सामान्य आहे. तुमची काहीही चूक नाही!
प्रत्येक समस्येवर उपाय आहे, मेनोपॉझवर देखील.
आयव्हीएफ सह मातृत्वाला संधी द्या. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये, तुमच्या प्रॉब्लेम नुसार सर्वोत्तम फर्टिलिटी उपचार प्रदान केले जातात.
तुमचे आई होण्याचे स्वप्न सत्यात उतरावा !
तज्ञ मार्गदर्शनासाठी संपर्क करा:
70309 44041/ 94239 71620
मेनोपॉज संबंधित अधिक विचारले जाणारे प्रश्न:
मेनोपॉजनंतर गर्भधारणा होऊ शकते का?
मेनोपॉज नंतर नैसर्गिक रित्या गर्भधारणा जरी शक्य नसली तरी ऍडवान्सड फर्टिलिटी ट्रीटमेंट जसे आयव्हीएफ च्या मदतीने गर्भधारणा शक्य आहे.
मेनोपॉझ कोणत्या वयात होतो? (Menopause kontya vayat yeto?)
मेनोपॉझ सामान्यपणे ४५ शी ते ५५ वया पर्यंत होते. सोबतच, या दरम्यान बहुतेक महिलांना हार्मोनल बदल देखील होतात.
मेनोपॉज ची लक्षणे (Menopause chi lakshane)
बहुतेकदा मेनोपॉज च्या दरम्यान महिलांना शरीरातून उष्णता निघण्याचा भास होतो.
यासोबतच, मेनोपॉज ची इतर लक्षणे जसे
- झोप न येणे
- नैराश्य
- वजन व्हाढने
- तोंड डोळे व त्वचा कोरडी पडणे
- डोकेदुखी
- हृदयात धडधड
- युरिनल इन्फेकशन
- केस गळणे किंवा कमकुवत होणे
- चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर व पाठीवरचे केस वाढणे
- दुखरे स्तन किंव्हा स्तनांचा आकार कमी होणे
Progenesis IVF
Progenesis IVF is the most successful IVF chain, having advanced fertility clinics in India. Creating miracles of birth since the past 40+ years, Progenesis team of fertility specialists has achieved the milestone of 6,000+ successful IVF pregnancies worldwide. With a whooping IVF success rate of 70-80%. Contact : +91 942 397 1620 / +91 703 094 4041