PCOD/PCOS ची समस्या असल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणा शक्य आहे का?

PCOD आणि PCOS सोबत गर्भधारणा शक्य आहे का
PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम. ही समस्या हार्मोनल इम्बॅलन्स (संप्रेरकांचे असंतुलन) मुळे उद्भवते. तसेच महिलांमध्ये 'अँड्रोजिन' या पुरुषी हार्मोनची उत्पादकता वाढीस लागते. याचाच परिणाम म्हणून स्त्रियांमध्ये पुरुषी लक्षणे अधिक दिसू लागतात. स्त्रियांना प्रभावित करणारी एक सर्वसामान्यरित्या सर्वत्र आढळणारी समस्या आहे.

Share This Post

बदलती जीवनशैली आणि इतर कारणांमुळे PCOD/PCOS चे प्रमाण वाढलेले आहे. PCOD/PCOS सह गर्भधारणा होऊ शकते का? गर्भधारणेवर आणि प्रेग्नन्सी वर काही परिणाम होईल का? PCOD/PCOS बरा होऊ शकतो का? किंवा मला PCOD/PCOS आहे मग पुढे काय होईल? अशा अनेक चिंता व्यक्त केल्या जात आहेत. चला तर मग सर्व शंकांची उत्तरे जाणून घेऊयात.

“PCOD” हि एक स्थिती आहे; ज्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊन पॉलिसिस्टिक ओवरी दिसते. “PCOS” हा एक “क्रोनिक डिसीज” आहे; पण १०० टक्के उपचार होऊ शकतात. यामध्ये देखील हार्मोनल इम्बॅलन्स, ओवरीयन सिस्ट आणि पॉलिसिस्टिक ओवरी दिसून येते. PCOD आणि PCOS एकाच आजारांची दोन नावं आहेत. पण PCOS अधिक गंभीर स्वरूपाचा आजार आहे.

जगभरात २६ % महिलांना PCOD मुळे “वंध्यत्व समस्या” निर्माण झालेली आहे. भारतात हे प्रमाण ३.७ ते २२.५ % इतके आहे. (pib.gov.in)

PCOD आणि PCOS कंडिशन काय आहे?

नॉर्मल कंडिशन : स्त्री जन्माला येते ती लाखो स्त्रीबीजे सोबत घेऊनच. अंडाशयातील पूर्णतः परिपक्व झालेले एक-एक अंडबीज ओव्हरीज सोडू लागतात आणि मासिक पाळी सुरु होते. हि झाली सर्वसामान्य प्रक्रिया.

PCOD/PCOS कंडिशन : ’’ओवॅरियन सिंड्रोम” म्हणजे स्त्रियांच्या अंडाशयाशी संबंधित असलेला एक आजार. ”पॉली” म्हणजे ”अनेक” आणि ”सिस्ट” म्हणजे ”द्रवाने भरलेल्या पिशव्या”. PCOD/PCOS मध्ये एक-दोन बीज फलित होण्याऐवजी अनेक बीजांची अर्धवट वाढ होते. अपुरी वाढ झालेली अनेक स्त्रीबीजे अंडाशयात साचून राहतात. यालाच सिस्ट म्हणतात.

PCOD आणि PCOS मध्ये काय होते?

  • फर्टिलिटी समस्या/ वंध्यत्व
  • अनियमित मासिक पाळी
  • पॉलिसिस्टिक ओवरी
  • अंडाशयात गाठी होणे
  • वेदनादायी मासिक पाळी
  • मासिक पाळीसंबंधी समस्या
  • पुरुषी लक्षणांमध्ये वाढ.
  • चेहऱ्यावर, छातीवर केस येणे
  • हार्मोनल इम्बॅलन्स
  • वजनवाढ

PCOD सह गर्भधारणा

आय.व्ही.एफ. विशेषज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर म्हणतात की, ”PCOD ही एक कॉमन समस्या आहे, परंतु मेजर समस्या नाही. स्टेप बाय स्टेप योग्य उपचार घेतल्यास गर्भधारणा राहू शकते.

PCOD सह गर्भधारणेसाठी उपचार

PCOD समस्येने ग्रस्त असाल आणि नैसर्गिक गर्भधारणा होत नसेल, तर तुम्हाला उपचारांची आवश्यकता आहे.

प्राथमिक उपचार खालीलप्रमाणे केले जातात.

  • मेडिकेशन्स : औषधे देऊन हार्मोन बॅलन्स करणे.
  • लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणे
  • योग्य आहार (डाएट) आणि व्यायाम
  • वजन कमी करणे

अशा प्रकारे परिस्थिती नियंत्रणात आणून नैसर्गिकरित्या गर्भधारणा शक्य आहे.

प्राथमिक उपचारांनी पोजीसीव्ह रिझल्ट मिळाला नाही, तर :

  • ओव्यूलेशन इंडक्शन : औषधोपचाराने बीजांची वाढ करणे आणि इंजेक्शन्स वापरून फर्टिलायझेशन क्वालिटी इम्प्रूव्ह करून योग्य वेळी इंटरकोर्स करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे गर्भधारणा होऊ शकते.
  • IUI (इंट्रा युटेरियन इन्सिमेशन) : स्त्री च्या गर्भाशयात फेलोपियन ट्यूब्ज जवळ पोषण पुरविलेले आणि स्वच्छ केलेले (sperm washing) स्पर्म्स ट्रान्स्फर करणे.
  • IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) : प्रयोगशाळेत स्त्रीबीज आणि शुक्राणू फर्टीलाइज करून बनलेला भ्रूण (embryo) स्त्री च्या गर्भाशयात ट्रान्सफर करणे.
  • ऍडवान्सड IVF (ICSI, IMSI, PICSI, TESE, MESA) : जेव्हा स्त्रीबीज आणि शुक्राणू लॅब मध्ये फर्टीलाइज होऊ शकत नाहीत, तेव्हा ICSI  चा वापर करून स्पर्म स्त्रीबीजामध्ये इंजेकट करून फर्टीलाइज केले जातात. महिलांचे ओवुम कलेक्शन केले जाते तर, पुरुषांचे स्पर्म कलेक्शन नैसर्गिकरित्या केले जाते किंवा अधिक समस्या असल्यास TESE, MESA सारखे आधुनिक उपचार वापरून स्पर्म कलेक्शन केले जाते.
  • लॅपरोस्कोपिक सर्जरी : लॅपरोस्कोपिक सर्जरीने एंड्रोजन निर्माण करणाऱ्या टिश्यूचा नाश करण्यात मदत होऊ शकते.
  • लॅप्रोस्कोपिक ओवरियन ड्रिलिंग : अंडाशयाद्वारे तयार होणाऱ्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन ची पातळी कमी करण्यास मदत करते.

PCOD सह गर्भधारणेसाठी काय करावे?

  • औषधोपचारांनी हार्मोनल बॅलन्स करणे आणि जीवनशैलीत बदल केल्यास गर्भधारणा होऊ शकते.
  • बऱ्याचदा वजन कमी केल्याने देखील पॉजिटीव्ह रिझल्ट मिळू शकतो.
  • संतुलित आहार (healthy diet) आणि योगा, चालणे-धावणे-इतर व्यायाम यांमुळे गर्भधारणेसाठी शरीर उत्तम तयार होते.
  • वजन नियंत्रित ठेवावे
  • अल्कोहोल, कॅफेन आदींचे सेवन टाळावे
  • डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून हार्मोनल मॉनिटरिंग करावे.
  • ओवुलेशन प्रेडिक्टर किट चा वापर करून तुमची ओवुलेशन विंडो जाणून घ्या. आणि ओवुलेशन काळात इंटरकोर्स करा.
  • तुम्ही नैसर्गिकरित्या प्रयत्न करीत असाल तर, इंटरकोर्स ची वारंवारिता जास्त असावी. त्यामुळे गर्भधारणेचे चान्सेस वाढतात.

PCOD आणि PCOS मधील फरक :

PCOD PCOS
PCOD ही एक वैद्यकीय स्थिती आहे; जिथे स्त्रियांच्या अंडाशयात अपरिपक्व किंवा अंशतः अशुद्ध स्त्रीबीजे तयार होतात, जी सिस्टमध्ये बदलतात.PCOS ही एक अधिक गंभीर स्थिती आहे जिथे अंडाशय जास्त प्रमाणात पुरूष संप्रेरक तयार करतात, परिणामी जास्त प्रमाणात गळू तयार होतात.
PCOD १/३ महिलांना होतो.PCOS आजाराचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
PCOD महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करत नाही. सुमारे 80% स्त्रिया औषधे आणि जीवनशैलीत बदल करून गर्भवती होतात.PCOS चा फर्टिलिटी आरोग्यावर परिणाम होतो. स्त्रीचे नियमित ओव्हुलेशन होत नसल्याने गर्भधारणा होणे कठीण होते. वेळेपूर्वी प्रसूती, गर्भपात यांचाही धोका असतो. उपचार घेणे महत्त्वाचे असते.
PCOD मध्ये इतर आजार व कॉम्प्लिकेशन्स नसतात.PCOS मध्ये टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि प्रगत एंडोमेट्रियल कर्करोगा चा धोका असतो.
आहार आणि जीवनशैलीतील बदल यातून PCOD वर नियंत्रण मिळते.PCOS कायमस्वरूपी बरा होऊ शकत नाही. पण वैद्यकीय उपचारांनी नियंत्रित करता येतो.
PCOD मध्ये पुरुषी हार्मोन्स ची निर्मिती होत नाही. कमी गंभीर, कमी लक्षणे क्वचित दिसून येतात.PCOS मध्ये पुरुषी हार्मोन्स निर्माण होतात. लहान वयातच लक्षणे दिसू शकतात.
PCOD मध्ये अशा समस्या नसतात.PCOS हा मेटॅबॉलिक डिसऑर्डर (चयापचय संबंधित), इंडोक्राइन डिसऑर्डर (अंतःस्रावी आजार), Cronic, अन-क्युरेबल (बरा न होऊ शकणारा) आजार आहे.
PCOD मध्ये सौम्य ते माध्यम (mild to moderate) लक्षणे दिसतात.PCOS स्थितीसाठी इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट आणि इतर आजारांचे नियंत्रण करण्यासाठी सक्रिय उपचार पद्धती ची गरज असते.
difference between pcod and pcos

PCOD कारणे :

  1. अनुवंशिकता
  2. न्यूरो-इंडोक्राइन डिसऑर्डर
  3. बैठी जीवनशैली
  4. चुकीचा आहार
  5. लठ्ठपणा

पीसीओडी चे निदान

1सोनोग्राफीसोनोग्राफी चा वापर करून स्त्रीबीजाच्या वाढीचे निरीक्षण केले जाते. ही एक प्राथमिक तपासणी आहे.
2ब्लड टेस्टफॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स (Follicle Stimulating Hormone), ल्युटेनायझिंग हॉर्मोन्स (Luteinizing hormone), टेस्टॉस्टेरॉन (Testosterone), थायरॉईड, प्रोलॅक्टिन लेव्हल अशा काही ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
3पेल्विक अल्ट्रासाउंडपीसीओडीच्या आणि पीसीओएस च्या सर्व केसेस मध्ये अल्ट्रासाऊंडद्वारे ओव्हेरियन सिस्ट शोधणे आवश्यक आहे.
पीसीओडी चे निदान

तुम्हाला पीसीओडी आहे हे कसे ओळखाल?

अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रॉडक्शन ने सांगितलेल्या खालीलपैकी तीन लक्षणांपैकी दोन लक्षणे दिसत असतील तर तुम्हाला PCOD आहे असे समजावे.

  1. सोनोग्राफी मध्ये पॉलिसीस्ट ओवरी दिसणे.
  2. चेहऱ्यावर केस आणि पुरळ असणे (अँड्रोजिन, टेस्टस्टरॉन आणि डी.एच.ए. ची मात्र वाढणे).
  3. मासिक पाळी अनियमित असणे.

अधिक विचारले जाणारे प्रश्न:

PCOD आणि PCOS कायमचा बरा होऊ शकतो?

PCOD लाइफस्टाइल चेंजेस आणि औषधांनी नियंत्रित करता येऊ शकतो. तर PCOS साठी डॉक्टरांकडून उपचार घेण्याची आवश्यकता असते. PCOS वैद्यकीय उपचाराने नियंत्रित करता येतो.

PCOS सोबत लवकर गर्भधारणेसाठी योग्य वय कोणते?

सामान्यपणे 32 वर्षांच्या वयानंतर प्रजनन पातळी कमी होण्यास सुरवात होते आणि वयाच्या 37 नंतर अधिक घसरण नोंदवली जाते. PCOS असलेल्या स्त्रियांसाठी नैसर्गिक गर्भधारणेची सर्वाधिक शक्यता 35 वर्षापूर्वीच राहते. ३५ वर्षांपर्यंत गर्भधारणेसाठी योग्य कालावधी असतो. मात्र पीसीओएस केसेस मध्ये लवकरात लवकर उपचार घेतल्यास पीसीओएस सोबत गर्भधारणा शक्य आहे.

अविवाहित मुलींना PCOD होऊ शकतो का?

पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम तरुण अविवाहित मुलींच्या जीवनावर परिणाम करत आहे. ज्यात लठ्ठपणा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

PCOD आणि PCOS ट्रीटमेंट केव्हा घ्यावी ?

हा एक क्रोनिक आजार आहे त्यामुळे फक्त गर्भधारणेसाठीच नव्हे तर शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी, समस्या असल्यास पीसीओडी ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे. PCOS ची काही लक्षणे, जसे की हार्मोनल असंतुलन आणि संबंधित वजन वाढणे, गर्भधारणेनंतर परत येऊ शकतात आणि आणखी बिघडू शकतात. शिवाय  मेंटल डिस्टर्बन्स, हृदय समस्या उद्भवू शकतात.

PCOD मध्ये AMH हार्मोन ची मात्र कमी कशी करावी?

नियमित व्यायामाने आणि तुमच्या जेवणात अधिक फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, नट, बिया आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करून संतुलित आहार घेऊन PCOS चे व्यवस्थापन करून AMH ची उच्च पातळी नैसर्गिकरित्या कमी केली जाऊ शकते.

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

गर्भावस्था के लिए प्रायमरी फर्टिलिटी इलाज : ‘ओव्यूलेशन इंडक्शन ट्रीटमेंट’

‘इनफर्टिलिटी’ जो की दुनियाभर के लाखो जोड़ों की समस्या बन गई है। जिनमें से ओवुलेशन समस्या इनफर्टिलिटी एक मुख्य कारन है। फर्टिलिटी ट्रीटमेंट में सबसे पहला और प्राथमिक इलाज है ‘ओव्यूलेशन इंडक्शन’। लेकिन इस उपचार के लिए जोड़े की उम्र, इनफर्टिलिटी का अवधि, इनफर्टिलिटी की समस्याएं, मेडिकल हिस्टरी को ध्यान में रखा जाता है। तो ओव्यूलेशन इंडक्शन क्या है,और किसे करना चाहिए, सक्सेस रेट ऐसी और जानकारी के लिए ब्लॉग अंत तक पढ़ें।

फर्टिलिटी आरोग्यावर वयाचा प्रभाव

वय ही फक्त एक संख्या आहे, परंतु जेव्हा फर्टिलिटी क्षमतेचा विचार केला जातो तेव्हा ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. ज्या व्यक्तींनी आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा ३५ वयानंतर कुटुंब सुरू करण्याचा विचार केला आहे त्यांनी वय आणि फर्टिलिटी चा संबंध जाणून घेणे आवश्यक आहे. अधिक वयात नैसर्गिक गर्भधारणेचे चान्सेस आणि IVF चे चान्सेस किती असतात यासह अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ब्लॉग जरूर वाचा.