IVF म्हणजे काय? आयव्हीएफ उपचार आणि प्रक्रिया

या लेखात आपण 'प्राथमिक आयव्हीएफ' उपचार प्रक्रिया, सक्सेस रेट, आयव्हीएफ केव्हा आणि कुणी करावे याविषयी चर्चा करणार आहोत. तुमच्या फर्टिलिटी उपचारांमध्ये माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करणे हाच लेखाचा उद्देश आहे.

Share This Post

फर्टिलिटी क्षेत्रात सर्वोत्तम, सुरक्षित आणि सर्वाधिक यशदर पुरविणारी उपचार पद्धती म्हणजे IVF उपचार. आयव्हीएफ हा काही शेवटचा पर्याय नाही ! आयव्हीएफ मध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सुद्धा उपलब्ध आहे.

या लेखात आपण ‘प्राथमिक आयव्हीएफ’ उपचार प्रक्रिया, सक्सेस रेट, आयव्हीएफ केव्हा आणि कुणी करावे याविषयी चर्चा करणार आहोत. तुमच्या फर्टिलिटी उपचारांमध्ये माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करणे हाच लेखाचा उद्देश आहे.

आयव्हीएफ काय आहे?

आयव्हीएफ म्हणजे ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’. ‘इन विट्रो’ म्हणजे शरीराच्या बाहेर आणि ‘फर्टिलायझेशन’ म्हणजे गर्भाधान.

आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू एका आधुनिक प्रयोगशाळेत जोडले जातात आणि गर्भ बनवला जातो.

आयव्हीएफ उपचार कुणी घ्यावेत?

  • एक वर्षाहून अधिक काळ प्रयत्न करूनही गर्भधारण होत नसल्यास
  • प्राथमिक फर्टिलिटी उपचार आययूआय, ओव्यूलेशन इंडक्शन वारंवार अयशस्वी होत असल्यास
  • ४० हुन अधिक वय असल्यास
  • दोन्ही फेलोपियन ट्यूब ब्लॉक असल्यास किंवा खराब असल्यास
  • एन्डोमेट्रिओसिस, फायब्रॉईड, अंडाशयाचे विकार, गर्भाशयाचे विकार नैसर्गिक गर्भधारणेत अडथळा ठरत असल्यास
  • ओवुलेशन समस्या असल्यास
  • शुक्राणूंची कमी, शुक्राणू नसणे, शुक्राणू वाहिनी ब्लॉकेज, व्हेरिकोसिल सारख्या समस्या असल्यास
  • ट्युबल लिगेशन सर्जरी नंतर पुन्हा आई-बाबा होण्याची इच्छा असल्यास
  • अनुवांशिक विकारांचा इतिहास असल्यास
  • सेक्श्युअल डिसऑर्डर मुळे नैसर्गिक गर्भधारणेत अडथळे येत असल्यास
  • सिव्हिअर एन्डोमेट्रिओसिस असल्यास
  • एंडोक्राइन डिसऑर्डर असल्यास
  • सिव्हिअर इन्फेक्शन्स मुळे रिप्रॉडक्टिव्ह अवयवांचे कार्य बिघडले असल्यास
  • सर्व टेस्ट नॉर्मल असून गर्भधारणेत अडचण येत असल्यास

आयव्हीएफ उपचार स्टेप बाय स्टेप

स्टेप १:

  • ओवॅरियन स्टिम्युलेशन : कंट्रोल ओवॅरियन हायपरस्टीम्युलेशन (COH) पद्धतीचा वापर करून GnRh हार्मोन चा स्त्राव दाबला जातो. त्यानंतर GnRh इंजेकशन्स देऊन अनेक स्त्रीबीजांचा विकास घडवून आणला जातो. म्हणजेच ओवरी स्टिम्युलेट होते.
  • फॉलिक्युलर स्टडी : अल्ट्रासाउंड च्या मदतीने डॉक्टर वेळोवेळी या स्त्रीबीजांची वाढ तपासतात. त्याला फॉलिक्युलर स्टडी म्हणतात. जेव्हा स्त्रीबीजांचा हवा तेवढा विकास होतो तेव्हा HCG (ह्युमन कोरीओनिक गोनॅडोट्रोफीन) इंजेक्शन दिले जाते. स्त्रीबीजांच्या विकासाची हि अंतिम पायरी असते.
आयव्हीएफ उपचार स्टेप १

स्टेप २:

  • ओवम पीक अप :  HCG इंजेक्शन दिल्यानंतर साधारणपणे ३४-३६ तासांनंतर स्त्रीबीजे मिळवण्याची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेसाठी महिलेला भूल देऊन अंडाशयातून विकसित झालेली स्त्रीबीजे अल्ट्रासोनोग्राफी आणि सुईच्या मदतीने मिळविली जातात. हि बीजे फर्टिलायझेशन साठी तयार असतात. ‘फॉलिक्युलर फ्ल्युइड्स’ एम्ब्रियोलॉजिस्ट द्वारे स्कॅन केली जातात. मिळवलेली स्त्रीबीजे लॅब मध्ये सुरक्षित ठेवली जातात.
  • स्पर्म कलेक्शन : पुरुष साथीदाराचे सीमेन सॅम्पल (वीर्य नमुना) कलेक्ट केले जाते. नैसर्गिक पद्धती वापरून किंवा आधुनिक स्पर्म रिट्रायवल टेक्निक वापरून ५० हजार ते १ लाख शुक्राणू मिळवले जातात.

आयव्हीएफ उपचार स्टेप २

स्टेप ३:

  • फर्टिलायझेशन : मिळवलेले स्त्रीबीज आणि शुक्राणू पेट्री ट्रे मध्ये फर्टिलायझेशन साठी ठेवले जातात. एकमेकात मिसळले जातात. प्राथमिक आयव्हीएफ उपचारामध्ये शुक्राणूंची स्वतःहून स्त्रीबीज फलित करणे अपेक्षित असते. या पद्धतीने गर्भ तयार होतो.

स्टेप ४:

  • एम्ब्रियो फॉर्मेशन : लॅब मध्ये बनवलेला गर्भ ३ दिवसापर्यंत किंवा ५ दिवसापर्यंत लॅब मध्ये वाढविला जातो. मेडिकल भाषेत ३ दिवसांच्या गर्भाला एम्ब्रियो म्हणतात, तर ५ दिवसांच्या गर्भाला ब्लास्टोसिस्ट म्हणतात. लॅब मध्ये भ्रुण वाढवण्याची प्रक्रिया म्हणजे एम्ब्रियो फॉर्मेशन.

आयव्हीएफ उपचार स्टेप ३, ४

स्टेप ५:

  • एम्ब्रियोची निवड करणे : बनवलेला कोणताही एम्ब्रियो ट्रान्स्फर केला जात नाही. ज्या दिवशी एम्ब्रियो ट्रान्स्फर करायचा असतो, त्या दिवशी सकाळी लवकर भ्रूणाचे मूल्यांकन केले जाते. एम्ब्रियोलॉजिस्ट एम्ब्रियो चे इमेजेस क्लिक करतात. भ्रूणाचा विकास आणि भरून दिसायला कसा आहे याच्या आधारावर सर्वोत्तम एम्ब्रियो ट्रान्स्फरसाठी निवडला जातो. किती एम्ब्रियो ट्रान्स्फर करायचे हि संख्या देखील याचवेळी ठरवली जाते.
  • एम्ब्रियो ट्रान्स्फर करणे : लॅब मध्ये बनवलेला गर्भ महिलेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया हि अंतिम आणि एका महिलेसाठी सुखदायक प्रक्रिया आहे. वेदनारहित प्रक्रिया असून यासाठी भूल देण्याची गरज नसते.

आयव्हीएफ उपचार स्टेप ५

IVF म्हणजे काय हे सर्वानाच माहिती आहे. पण IVF साठी आल्यापासून ते गर्भधारणेपर्यंत कशी प्रोसेस केली जाते ? याविषयी बोलताना सिनिअर फर्टिलिटी कन्सल्टन्ट डॉ. नरहरी मळगांवकर सांगतात कि, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये सर्वप्रथम जोडप्यांची फर्टिलिटी हिस्टरी आणि कौन्सेलिंग केली जाते. त्यानंतर वंध्यत्व समस्येचे अचूक निदान केले जाते.

महिलेच्या गर्भाशयाचे अस्तर, ओव्यूलेशन, फॅलोपियन ट्यूब ची स्थिती, स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता, इतर आजार, मिसकॅरेज चा इतिहास असा सर्व प्रकारे डिटेल स्टडी केला जातो. त्यानंतर IVF ची गरज आहे का आणि कोणत्या प्रकारच्या IVF ची गरज आहे हे ठरवून IVF केले जाते.

Dr. Narhari Malagaonkar यांच्याकडून अधिक सविस्तर IVF प्रक्रिया जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहा.

Reference:

IVF Treatment Information in Marathi

आयव्हीएफ (IVF) उपचार कुणी आणि कधी घ्यावे?

Subscribe To Our Newsletter

Get updates and learn from the best

More To Explore

What is a Trigger Shot in IVF?

A trigger shot is a hormone injection used in fertility treatments to promote egg maturation and release from the ovaries. It’s also called an HCG shot since it typically contains the hormone human chorionic gonadotropin (HCG).

एनओव्यूलेशन (Anovulation) : पहचान, कारण और इलाज

एनओव्यूलेशन (Anovulation) एक ऐसी स्थिति है जिसमें महिला के मासिक चक्र (period cycle) के दौरान ओव्यूलेशन नहीं होता है, यानी कोई अंडाणु (egg) रिलीज नहीं होता। इस स्थिति में गर्भधारण करना मुश्किल हो जाता है, क्योंकि अंडाणु के बिना गर्भधारण संभव नहीं होता।