अंडाशयाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी आहार आणि योगाचे महत्त्व

गर्भधारणेसाठी अंडाशय हे एक महत्वाचे अंग आहे. कारण स्त्रीबीजांचा विकास आणि वाढ अंडाशयामध्ये होतो. अंडाशयांकडून गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली स्त्रीबीजे सोडली जातात. अंडाशयाचे स्वास्थ्य उत्तम असेल तर उत्तम क्वालिटीचे स्त्रीबीज गर्भधारणेसाठी विकसित होतात. याउलट अस्वास्थ्यकार अंडाशयांमुळे ओव्यूलेशन समस्या निर्माण होते आणि गर्भधारणेत अडचणी येतात. चला तर मग, जाणून घेऊयात अंडाशयांच्या स्वास्थ्यासाठी आहार आणि योगा.