एका स्वस्थ बाळासाठी आणि गर्भधारणेसाठी चांगला गर्भ बनायला हवा. चांगल्या गर्भासाठी स्त्रीबीज आणि शुक्राणू उत्तम प्रतीचे असणे गरजेचे आहे. चांगल्या बीजांसाठी तुमचे खानपान आणि आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. गर्भधारणेसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भाशयाचे अस्तर व्यवस्थित बनायला हवे, जेणेकरून गर्भ रुजेल आणि वाढेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वयात आणि योग्य वेळी (जेव्हा तुम्ही फर्टाईल असतात) गर्भधारणेचा प्रयत्न करायला हवा.
Table of Contents
वर्षभर प्रयत्न करूनही गर्भधारणा झाली नाही तर ‘हे’ करा.
फर्टिलिटी डॉक्टरांचे कन्सल्टेशन :
जेव्हा एक वर्षाहून अधिक काळ गर्भधारणेसाठी प्रयत्न करूनदेखील गर्भधारणा होत नसेल, तर तुम्हाला वंध्यत्व समस्या आहे. वंध्यत्वाचे कारण स्त्रिया किंवा पुरुषांमध्ये किंवा दोघांमध्येही असू शकते. त्यासाठी फर्टिलिटी डॉक्टरांकडून कन्सल्टेशन करा. ते स्त्री आणि पुरुष दोघांच्याही फर्टिलिटी आरोग्याची तपासणी करून वंध्यत्वाचे अचूक निदान करतात.
वंध्यत्व उपचारांसाठी आधुनिक सुविधा, आधुनिक उपचार एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या सेंटर ची निवड करणे गरजेचे आहे. तसेच क्लिनिक मधील डॉक्टर अनुभवी आणि फर्टिलिटी विशेषज्ञ असावेत.
‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ मध्ये मोफत कन्सल्टेशन केल्यास, वंध्यत्वाचे अचूक निदान व आधुनिक उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.
फर्टिलिटी टेस्ट्स :
- ब्लड टेस्ट : रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन, AMH हार्मोन टेस्ट, थायरॉईड, TB, इन्फेक्शन्स, हिमोग्लोबिन इत्यादी रक्त चाचण्या केल्या जातात.
- अल्ट्रासाउंड : स्त्रियांच्या रिप्रॉडक्टिव्ह अवयवांची स्थिती तपासण्यासाठी सोनोग्राफी, डिटेल सोनोग्राफी किंवा व्हजायनल सोनोग्राफी केली जाते. तर पुरुषांमध्ये स्क्रोटम अल्ट्रासाउंड केले जाते.
- हिस्ट्रोसॅलपिंगोग्राम : फेलोपियन ट्यूब ब्लॉकेजेस तपासण्यासाठी हिस्ट्रोसॅलपिंगोग्राम केले जाते.
- सीमेन अनालिसिस : पुरुषांमध्ये वीर्य तपासणी करून शुक्राणूंची संख्या, गती, मॉर्फोलॉजी, स्पर्म कॉन्सन्ट्रेशन तपासले जाते.
- लॅप्रोस्कोपी/हिस्टेरोस्कोपी : बेसिक टेस्ट्स मधून वंध्यत्व समस्येचे निदान न झाल्यास लॅप्रोस्कोपी किंवा हिस्टेरोस्कोपी करून अधिक बारकाईने रिप्रॉडक्टिव्ह अवयवांची स्थिती तपासली जाते. सोबतच फायब्रॉईड, पॉलीप्स, ट्युबल ब्लॉकेजेस ओवॅरियन सिस्ट असतील तर ते काढून टाकले जातात. आणि वंध्यत्वाचे निदान होते.
सर्जिकल इलाज :
आई-बाबा होण्यात अडचणी निर्माण करणाऱ्या काही स्थितींसाठी सर्जरी केली जाते. जसे कि, फाइब्रॉइड्स, थिक यूटेरियन लायनिंग, ओवरियन सिस्ट, चॉकलेट सिस्ट, ट्यूबल ब्लॉकेज इत्यादी। पुरुषांमध्ये शुक्राणुवाहिनी ब्लॉकेज सारख्या समस्या असल्यास सर्जरी केली जाते. आवश्यकतेनुसार सर्जरी केल्या जातात.
चला तर मग जाणून घेऊयात काही सर्जिकल उपचारांबद्दल :
- सालपिंगेंक्टॉमी : ट्युबल ब्लॉकेज असल्यास ट्यूब ला काढून टाकले जाते।
- लैप्रोस्कोपी/हिस्टेरोस्कोपी : नाभि जवळ छेद करून एक दांडी सदृश्य डिवाइस पोटामध्ये टाकले जाते. त्याच्यापुढे कॅमेरा बसवलेला असतो. फाइब्रॉइड, ओवरियन ड्रिलिंग, पोलिप्स, ट्यूबल ब्लॉकेज दूर करणे आणि खराब ट्यूब काढून टाकणे असे उपचार यामध्ये केले जातात.
- फोकस्ड अल्ट्रासाउंड, मायोमेक्टमी, ऐंडोमेट्रिअल एब्लेशन सारखे सर्जिकल उपचार वापरून फाइब्रॉइड चे उपचार केले जातात.
- ट्युबल लिगेशन रिव्हर्सल सर्जरी : गर्भनिरोधक शस्त्रक्रियेनंतर पुन्हा गर्भधारणेची योजना असेल तर, ट्युबल लिगेशन रिव्हर्सल सर्जरी केली जाते. तर पुरुषांमध्ये वासेक्टॉमी रिव्हर्सल सर्जरी केली जाते.
फर्टिलिटी ट्रीटमेंट
- ओव्यूलेशन इंडक्शन : यामध्ये ओवुलेशन मॉनिटरिंग च्या मदतीने स्त्रीबीजांची वाढ वेळोवेळी सोनोग्राफीद्वारे तपासली जाते. स्त्रीबीज ओव्यूलेट झाल्याचे या तपासणीत दिसल्यानंतर योग्य वेळी सेक्श्युअल इंटरकोर्स साठी सांगितलं जातं.
- मेडिसिन्स : हार्मोनल इम्बॅलन्स साठी किंवा इन्फेक्शन्स असल्यास मेडिसिन्स दिले जातात. स्त्रियांमध्ये ओवुलेशन साठी फर्टिलिटी मेडिसिन्स दिले जातात.
- IUI : इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन : बेसिक उपचारांतून रिझल्ट मिळत नाही तेव्हा, एक पाऊल पुढे जाऊन IUI ट्रीटमेंट देण्याचा निर्णय घेतला जातो. IUI उपचारांमध्ये पुरुषांचे स्पर्म्स कलेक्शन करून स्पर्म वॉशिंग करून नंतर स्त्रीच्या गर्भनलिकेपर्यंत सोडले जातात. यामुळे नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा १०-१५ टक्के प्रेग्नेंसी चान्सेस वाढतात.
- असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) : यामध्ये मॅच्युअर एग्ज रिट्राईव्ह (कलेक्ट) केले जातात आणि प्रयोगशाळेतील ट्रे मध्ये स्पर्म सोबत फर्टीलाइज करून आणि पुन्हा गर्भ गर्भाशयात स्थानांतरित केले जातात. तसेच पुरुषांमधील स्पर्म कलेक्शन नैसर्गिक पद्धतीने केले जाते. याशिवाय ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया किंवा रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन समस्या असतील तर, TESA, MESA, PESA,TESE, MICRO-TESE सारखे आधुनिक उपचार वापरून स्पर्म्स मिळवले जातात.
- IVF-ICSI/IMSI/PICSI : मॉर्फोलॉजिकली स्पर्म सिलेक्ट केला जातो किंवा बायोलॉजिकल उत्तम क्वालिटी चा स्पर्म फर्टिलायझेशन साठी निवडला जातो. हा स्पर्म मायक्रोपिपेट च्या मदतीने स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करून गर्भ बनविला जातो. त्यानंतर गर्भ मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो.
- LAH : गर्भ रुजण्यात समस्या असल्यात गर्भाचे बाह्य आवरण (शेल) तोडले जाते. या प्रक्रियेला लेजर असिस्टेड हॅचिंग असे म्हणतात.
- जेनेटिक टेस्टिंग (PGD/PGT-A) : ART उपचारादरम्यान बनवलेल्या गर्भातील डीएनए तपासणे, डीएनए फ्रॅगमेंटेशन रेट, गुणसूत्र/क्रोमोसोम डिफेक्ट, अतिरिक्त गुणसूत्र किंवा गुणसूत्रांची कमतरता अशा जनुकीय स्थितीचे निदान करता येते. जेनेटिकली उत्तम क्वालिटीचा गर्भ निवडून असा गर्भ मातेच्या गर्भाशयात ट्रान्स्फर केला जातो.
याशिवाय क्रायोप्रिझर्वेशन म्हणजेच स्त्रीबीज, शुक्राऊ किंवा भ्रूण गोठवून ठेवणे, ब्लास्टोसिस्ट ट्रान्स्फर, SET – सिक्वेन्शियल ट्रान्स्फर, फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्स्फर, डोनर एग, डोनर एम्ब्रियो, सरोगसी असे गर्भधारणेसाठी बरेच आधुनिक उपचार उपलब्ध आहेत.
‘बाळ हवंय’? मग करा या गोष्टी
- पोषक अन्नाचे सेवन करा: ताजी फळे, प्रामुख्याने व्हिटॅमिन सी असलेले लिंबू वर्गीय फळे, हिरव्या भाज्या, शेंगभाज्या, ड्राय फ्रुट्स, धान्य, लीन प्रोटीन, मोड आलेले पदार्थ, डांगर-सूर्यफूल-जवस-मेथीदाणे अशा बिया अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश आहारात केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. या पदार्थांमध्ये फॉलिक ऍसिड, सर्व प्रकारचे व्हिटॅमिन, क्षार, खनिजे, लोह भरपूर प्रमाणात असतात.
- नियमित व्यायमाने वजन नियंत्रित ठेवा: नियमित शारीरिक हालचाली तुच्या गर्भधारणेची शक्यता वाढवू शकतात. चालणे, धावणे, पोहणे, झुंबा सारखे डान्स, सायकल चालवणे, योगा असे व्यायाम प्रमाणात केल्यास फर्टिलिटी आरोग्य सुधारते. वजन नियंत्रित राहते. सोबतच ओव्यूलेशन, मासिक पाळी, हार्मोन लेव्हल्स सामान्य होण्यास मदत होते.
- फोलिक एसिड, विटामिन सी, विटामिन डी अणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् घ्या: डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड, कार्बोहायड्रेट्स, आयर्न टॅब्लेट्स घेऊ शकतात. तुमच्या रक्तातील घटक तपासून आणि लक्षणांनुसार डॉक्टर तुम्हाला औषधे देतील.
- तणावाचे नियंत्रण करा आणि हार्मोनल संतुलन राखा: जेव्हा तुम्ही सतत तणावातून जात असतात, तेव्हा तणावाचे हार्मोन तुमच्या रिप्रॉडक्टिव्ह हार्मोन वर विपरीत परिणाम करीत असते. तणाव नियंत्रित करण्यासाठी योगा आणि ध्यान हे विलक्षण पर्याय आहेत कारण ते विश्रांतीला प्रोत्साहन देतात आणि चिंता पातळी कमी करतात.
याशिवाय तुम्हाला आनंद मिळेल असे छंद जोपासावेत.
मसाज, अरोमा थेरपी, बाथ यांसारख्या हायड्रोथेरेपी केल्यास स्नायू रिलॅक्स होतात.
ध्यानधारणा, डीप ब्रिथिंग, प्राणायाम तुमचा तणाव कमी करतात आणि शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढवतात.
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा.
म्युजिक थेरपी : गायन, वादन, संगीत ऐकणे, लिरिक्स वर चर्चा केल्यास तणावाची पातळी कमी होते.
ओव्हरहीटिंग पासून स्वतःचा बचाव करा.
उष्णतेच्या संपर्कात काम करणे टाळा. लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करणे, मोबाईल चा अतिवापर करणे, हॉट बाथ यांमुळे टेस्टिकल्स चे तापमान वाढते आणि शुक्राणू विकृती निर्माण होते. त्यामुळे ओव्हरहीटिंग पासून स्वतःचा बचाव करा.
ओव्यूलेशन चा मागोवा घ्या आणि ओव्यूलेशन काळात संबंध ठेवा.
गर्भधारणेसाठी योग्य वेळी इंटरकोर्स करणे गरजेचे असते. जेव्हा अंडाशय परिपक्व स्त्रीबीज सोडतात, तेव्हा (ओव्यूलेशन काळात) इंटरकोर्स केल्यास गर्भधारणा होऊ शकते. ३ दिवस गर्भधारणेसाठी सुपीक काळ असतो. ओव्यूलेशन विंडो जाणून घेण्यासाठी ‘डिजिटल ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट’ चा वापर केल्यास ओव्यूलेशन काळ समजतो. हे किट ल्युटेनायझिंग हार्मोन ची मात्र मोजते. ओव्यूलेशन काळात LH लेव्हल्स वाढतात. त्यामुळे तुम्ही ओव्यूलेत झाले कि नाही ते समजते.
Read: गर्भधारणेची योग्य वेळ, जाणून घ्या ओवुलेशन कालावधी म्हणजे काय?
अधिक सर्च केले जाणारे प्रश्न
१) गर्भधारणा होत नसेल तर काय करावे ?
तुमचं वय ३५ पेक्षा कमी असेल आणि १ वर्ष गर्भधारणेसाठी प्रयत्न करूनदेखील यश मिळत नसेल; किंवा तुमचं वय ३५ पेक्षा जास्त आहे आणि ६ महिने प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
याव्यतिरिक्त मासिक पाळीशी संबंधित समस्या किंवा फर्टिलिटी वर परिणाम करणारे इतर ज्ञात आजार असतील तरी फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२) गर्भधारणेसाठी आवश्यक घटक कोणते?
फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२, आयर्न, झिंक, आयोडीन, बायोटिन, कार्बोहायड्रेट्स, ओमेगा-३ ऍसिड या घटकांची आवश्यकता असते. हे फर्टिलिटी व्हिटॅमिन्स गर्भधारणा करण्यास मदत करू शकतात. या घटकांचा आहारात समावेश करावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅबलेट स्वरूपात त्यांचे सेवन केल्यास गर्भधारणेचे चान्सेस वाढतात.