IUI अयशस्वी होण्याची कारणे आणि अयशस्वी IUI नंतर यशस्वी गर्भधारणेची शक्यता

IUI failure in Marathi | causes & symptoms of iui failure

IUI किंवा इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन हा तुलनेने प्रथम श्रेणीतील फर्टिलिटी ट्रीटमेंट(fertility treatment) पर्याय आहे ज्याची शिफारस वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना केली जाते. का? कारण PCOS, एनोव्हुलेशन (anovulation), किंवा शुक्राणूंच्या समस्यांशी संबंधित असलेल्यांसाठी IUI हा सर्वात योग्य उपचार पर्याय आहे.बहुतेक जोडपी IUI ला प्राधान्य देतात कारण ते शुक्राणू अंड्याच्या जवळ ठेवून नैसर्गिक गर्भधारणेची प्रक्रिया वाढवते. सोबतच हा उपचार पर्याय इतर फर्टिलिटी ट्रीटमेंट्स च्या तुलनेत कमी खर्चिक आहे.